बिना-भानेगावचे पुनर्वसन कधी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:14 IST2021-02-18T04:14:58+5:302021-02-18T04:14:58+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क खापरखेडा : वेकाेलि खाणीमुळे बिना व भानेगाव गावातील घरांना भेगा पडल्या असून, अनेकांच्या घरांची दुरवस्था झाली ...

बिना-भानेगावचे पुनर्वसन कधी?
लाेकमत न्यूज नेटवर्क
खापरखेडा : वेकाेलि खाणीमुळे बिना व भानेगाव गावातील घरांना भेगा पडल्या असून, अनेकांच्या घरांची दुरवस्था झाली आहे. त्यातच यंदा आलेल्या महापुरामुळे बिना गावाला माेठा धाेका निर्माण झाला आहे. त्यामुळे बिना व भानेगावचे पुनर्वसन हाेणार तरी कधी, असा प्रश्न गावकरी विचारत आहेत. या गावांच्या पुनर्वसनाच्या मागणीकडे लक्ष वेधण्याकरिता गावकऱ्यांनी ३ फेब्रुवारीपासून साखळी उपाेषण सुरू केले आहे.
वेकाेलि खाणीमुळे बिना व भानेगाव या दोन गावातील घरांना भेगा पडून ते जर्जर होत आहेत. शिवाय, यावर्षी आलेल्या महापुराने बिना गावाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे गावाचे पुनर्वसन करण्यात यावे, या मागणीसाठी ३ फेब्रुवारीपासून गावकऱ्यांनी साखळी उपोषण सुरू केले. दरम्यान, बुधवारी खासदार कृपाल तुमाने यांनी बिना गावात भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. वेकोलि व महाजेनकोने अद्याप मोबदला दिला नसल्याचे यावेळी चर्चेतून समोर आले. यावर वेकोलिकडून त्यांच्या वाट्याला येणारी मोबदल्याची रक्कम मिळवून देणार असल्याचे खासदार तुमाने यांनी सांगितले. तसेच महाजेनकोकडून मोबदला मिळवून देण्यासाठी राज्य सरकारकडे प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही देताना त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवर चर्चा करून गावाच्या पुनर्वसनाबाबत तातडीने बैठक लावावी, अशा सूचना केल्या.
याप्रसंगी गावकऱ्यांनी खासदार तुमाने यांच्याकडे समस्यांचे निवेदन साेपविले. यावेळी गावातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, जि. प. सदस्य नाना कंभाले, शुभम नवले, राज तांडेकर, राजन सिंग यांच्यासह गावकरी उपस्थित हाेते.