उपराजधानीतील उड्डाणपुलावरून दुचाकी जेव्हा घसरून पडू लागतात..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2022 20:53 IST2022-03-09T20:51:15+5:302022-03-09T20:53:29+5:30
Nagpur News आदिवासी शहीद गोवारी उड्डाणपुलावर दुपारच्या सुमारास राहटे कॉलनीकडील उतारावर ऑईल सांडले होते. उतारावर ऑईल सांडल्याने वेगाने येणाऱ्या दुचाकी वाहने घसरून पडत होती.

उपराजधानीतील उड्डाणपुलावरून दुचाकी जेव्हा घसरून पडू लागतात..
नागपूर : आदिवासी शहीद गोवारी उड्डाणपुलावर दुपारच्या सुमारास राहटे कॉलनीकडील उतारावर ऑईल सांडले होते. उतारावर ऑईल सांडल्याने वेगाने येणाऱ्या दुचाकी वाहने घसरून पडत होती. अनेक वाहने अनबॅलेन्स होत होती. काही वाहने घसरून चारचाकी वाहनांच्या कचाट्यात येत होती. बराच वेळ हा प्रकार सुरू होता. काही सुज्ञ नागरीकांनी लगेच अलर्टनेस दाखविला. त्यांनी वाहन चालकांना सांभाळून चालविण्यास सांगितले. धंतोली पोलीस स्टेशन व फायर ब्रिगेडला देखील संपर्क करून या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर लगेच फायर ब्रिगेड व पोलीस स्टेशनचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सांडलेल्या ऑईलवर रेती टाकली. काही वेळ वाहन चालकांना सांभाळून जाण्यास सांगितले.