शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
8
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
9
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
10
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
11
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
12
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
13
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
14
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
15
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
16
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
17
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
18
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
19
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल
20
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!

सहलीची बस रात्री घाटात बंद पडते तेव्हा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 19:54 IST

नरखेड तालुक्यातील बेलोना येथील आश्रमशाळेचे विद्यार्थी सोमवारी चिखलदरा येथे सहलीला गेले. परंतु परत येत असताना चिखलदरा येथील घाटात सायंकाळी ६.३० वाजता बस बंद पडली.

ठळक मुद्देनागपूर जिल्ह्यातील बेलोन्याचे विद्यार्थी मध्यरात्री सुखरूप पोहचले : सलील देशमुख यांचा पुढाकार

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर (नरखेड) : नरखेड तालुक्यातील बेलोना येथील आश्रमशाळेचे विद्यार्थी सोमवारी चिखलदरा येथे सहलीला गेले. परंतु परत येत असताना चिखलदरा येथील घाटात सायंकाळी ६.३० वाजता बस बंद पडली. कोणतीही मदत मिळत नसल्याने शिक्षकांची धाकधूक वाढली. इकडे मुले परत आली नसल्याने पालकही धास्तावले होते. शिक्षकांनी राष्ट्रवादीचे युवा नेते व जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख यांच्याशी संपर्क केला. सलील देशमुख यांनी विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी प्रशासनाला विनंती केली. शेवटी सर्व विद्यार्थी रात्री २ वाजता सुखरूप बेलोना येथे पोहोचले.बेलोना येथील मातोश्री सुमनबाई आश्रम शाळेचे ५४ विद्यार्थी आणि ६ शिक्षक हे सोमवारी सकाळी चिखलदरा येथे सहलीकरिता निघाले. यासाठी त्यांनी काटोल आगाराची बस बुक केली होती. दिवसभर सहलीचा आनंद घेतल्यानंतर सर्व जण परतीच्या प्रवासासाठी निघाले. चिखलदरा येथून काही अंतरावर येताच बस बंद पडली. रात्रीची वेळ आणि घनदाट जंगल यामुळे सर्वच भयभीत झाले. मदतीसाठी त्यांनी बराच प्रयत्न केला. परंतु कोणतीही मदत मिळत नव्हती. शेवटी शिक्षकांनी सलील देशमुख यांच्यासोबत संपर्क केला. सलील यांनी घटनेचे गांभीर्य ओळखत अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्रीहरी बालाजी तसेच चिखलदऱ्याचे पोलीस निरीक्षक शिंदे व परतवाड्याचे पोलीस निरीक्षक मानेकर यांच्यासोबत संपर्क केला. यानंतर तातडीने चिखलदऱ्याचे ठाणेदार शिंदे यांनी घाटात अडकलेली बस गाठली. ज्या ठिकाणी ही बस अडली होती त्या परिसरात मोठ्या प्रमाणात जंगली जनावरे राहतात. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी तातडीने पोलीस वाहनांनी सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांना परतवाडाकडे रवाना केले. तोपर्यंत देशमुख यांनी काटोल आगारप्रमुख डी.एम. रंगारी व परतवाडाचे आगारप्रमुख बालदे यांना सांगून दुसऱ्या बसची व्यवस्था करण्यास सांगितले. परतवाडा येथे पोहचल्यानंतर देशमुख यांनी सर्व विद्यार्थ्यांची जेवणाची व्यवस्था केली. रात्री दोन वाजताच्या सुमारास सर्व विद्यार्थी सुखरूप बेलोना येथे पोहचले.

 

टॅग्स :Studentविद्यार्थीSchoolशाळा