बसथांबा परिसरात गतिरोधक कधी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:13 IST2021-02-23T04:13:49+5:302021-02-23T04:13:49+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क बेलाेना : येथील बसथांबा परिसरात गतिराेधक तयार करण्याची मागणी गेल्या काही वर्षांपासून ‘जैसे थे’ आहे. याबाबत ...

बसथांबा परिसरात गतिरोधक कधी?
लाेकमत न्यूज नेटवर्क
बेलाेना : येथील बसथांबा परिसरात गतिराेधक तयार करण्याची मागणी गेल्या काही वर्षांपासून ‘जैसे थे’ आहे. याबाबत वारंवार मागणी करूनही सार्वजनिक विभाग त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आराेप नागरिकांनी केला आहे. बसथांबा चाैक परिसरात वर्दळ असते. याठिकाणी गतिराेधक नसल्याने वाहने सुसाट धावतात. परिणामी अपघाताची शक्यता बळावली आहे. त्यामुळे बसथांबा परिसरात गतिराेधक कधी, असा सवाल गावकरी विचारत आहेत.
बेलाेना येथील बसथांबा चाैकातून नरखेड-माेवाड मार्ग तसेच बेलाेना गावातून येरला मार्गसुद्धा जाेडल्या जाताे. त्यामुळे चाैकात सतत वर्दळ सुरू असते. नरखेड-माेवाड मार्गाची वाहने सुसाट धावतात. त्यामुळे येथे अपघाताचा धाेका निर्माण झाला आहे. गेल्या महिन्यात दाेन वेगवेगळ्या अपघातात दाेघांचा जागीच मृत्यू झाला. त्यामुळे या चाैकात गतिराेधक तयार करण्याची मागणी जाेर धरत आहे.
गावातील हा मुख्य रस्ता असून, या मार्गावर शेतकरी, विद्यार्थ्यांची रहदारी सुरू असते. अशावेळी बेलगाम वाहतुकीवर आळा घालण्यासाठी याठिकाणी गतिराेधक तयार करण्याची मागणी आहे. यासंदर्भात ग्रामपंचायत प्रशासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पत्रव्यवहारसुद्धा केला; परंतु अद्यापही गतिराेधक तयार करण्यात आलेले नाही. यामुळे गावकऱ्यांत असंताेष निर्माण झाला आहे. मार्गावरील वर्दळीचे प्रमाण लक्षात घेता, दाेन्ही रस्त्यावर गतिराेधक तयार करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.