शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले
2
अखेर बीएसएनएल नेटवर्क बदलणार, देशभरात या तारखेला 4G सेवा सुरु करण्याची घोषणा
3
"बेबी, आय लव्ह यू, तू खूप...", स्वयंघोषित बाबा रात्रभर पाठवायचा अश्लील मेसेज, ३५ मुलींचा छळ
4
डोळ्यांत मिरची पूड ओतली, नंतर साडीने लेकाचा गळा आवळला अन्...; जन्मदात्री आई इतकी क्रूर का झाली?
5
जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती लॅरी एलिसन ९५% संपत्ती दान करणार; काय आहे अट?
6
कमाल झाली राव! आता QR कोड नाही, तर फक्त अंगठ्याने करा पेमेंट; काय आहे ThumbPay?
7
भारताच्या हाती लागली मोठी शक्ती, धावत्या रेल्वेतून शत्रूवर मिसाईल डागता येणार; अग्नी प्राइमची चाचणी यशस्वी...
8
मुंबई पोलीस कॉन्स्टेबलच्या मृत्यूचं गूढ उकललं; ४ महिन्यांनी हत्येचा खुलासा, 'त्या' पत्रावर संशय
9
बाहुबली नेते राजा भैय्या यांच्या मुलांनी आईवर केले गंभीर आरोप, म्हणाले, "आमच्या घरात…’’  
10
ललिता पंचमी व्रत २०२५: शुक्रवारी इच्छापूर्तीसाठी 'असे' करा ललिता पंचमीचे व्रत; टाळा 'ही' एक चूक!
11
"हो मला बाबा व्हायचंय...", ५९व्या वर्षी सलमान खानला हवंय मूल, म्हणाला...
12
इथेनॉलचा डंख: सेकंड हँड कार, ती पण पेट्रोलची घेत असाल तर हा विचार जरूर करा...; २०२२ पूर्वीची घ्याल तर...
13
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांना मदत केलेला आरोपी सुरक्षा दलाच्या जाळ्यात; ऑपरेशन महादेवला मोठं यश
14
काश्मीर मुद्द्यावरून अमेरिकेचा पाकिस्तानला धक्का! पंतप्रधान मोदी-ट्रम्प भेटीबद्दलही केले मोठे विधान
15
'अशा' कमाईवर विशेष टॅक्स सूट नाही; कर सवलत मिळालेल्यांना थकबाकी भरावी लागणार, पण एक दिलासा...
16
"पैशाचं सोंग आणता येत नाही, मग सरकार शेतकऱ्यांना जीवन संपवू देणार का?’’, विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
17
एअरस्पेसमध्ये रशियाचा 'डिजिटल हल्ला'; स्पेनच्या संरक्षण मंत्र्यांच्या विमानाच्या जीपीएसमध्ये बिघाड, युरोपमध्ये खळबळ
18
महाराष्ट्रातील बेस्ट पर्यटन स्थळे क्लिक करा, ५ लाख जिंका; शासनाची अनोखी स्पर्धा, काय आहेत अटी?
19
नवरात्री २०२५: शुक्रवारी ललिता पंचमी, ३ शुभ योगासह, भद्रा राजयोगात ७ राशींचा भाग्योदय
20
लडाखमधील भडकलेल्या आंदोलनाचं पाकिस्तान कनेक्शन? सोनम वांगचूक यांच्या दौऱ्याबद्दल उपस्थित होताहेत शंका

दुकान उघडताना व्यापाऱ्यांनी करावे १३ सूत्री नियमांचे पालन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 00:36 IST

नागपुरातील बहुतांश बाजारपेठा ५ जूनपासून ‘ऑड-ईव्हन’सह नियमांच्या आधारे उघडणार आहेत. याकरिता नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सने (एनव्हीसीसी) १३ सूत्री नियमांची यादी तयार केली आहे. त्याचे सक्तीने पालन करून व्यवसाय करण्याचे आवाहन चेंबरचे अध्यक्ष अश्विन मेहाडिया यांनी व्यापाऱ्यांना केले आहे.

ठळक मुद्देएनव्हीसीसीचे आवाहन : जनजागृतीसाठी एनव्हीसीसी लावणार ३०० होर्डिंग

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपुरातील बहुतांश बाजारपेठा ५ जूनपासून ‘ऑड-ईव्हन’सह नियमांच्या आधारे उघडणार आहेत. याकरिता नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सने (एनव्हीसीसी) १३ सूत्री नियमांची यादी तयार केली आहे. त्याचे सक्तीने पालन करून व्यवसाय करण्याचे आवाहन चेंबरचे अध्यक्ष अश्विन मेहाडिया यांनी व्यापाऱ्यांना केले आहे.व्यापारी आणि ग्राहकांनी नियमांचे सक्तीने पालन केल्यास नागपुरात एक महिन्यात व्यावसायिक घडामोडी रुळावर येण्याची अपेक्षा आहे. नियमांचे पालन न केल्यास प्रशासनातर्फे दुकाने बंद केली जाऊ शकतात, अशी माहिती मेहाडिया यांनी चेंबरतर्फे आयोजित ऑनलाईन पत्रपरिषदेत दिली.मेहाडिया म्हणाले, कोविड संक्रमणाप्रति जागरूकतेसाठी चेंबर मनपाच्या सहकार्याने शहरात ३०० होर्डिंग लावणार आहे. तसेच चीनच्या उत्पादनांवर बहिष्कार करून स्वदेशी उत्पादनांचा अवलंब करण्यासाठी चेंबर मोहीम राबविणार आहे. वाहतुकीची समस्या दूर झाल्यानंतर उत्पादनांच्या पुरवठ्यात कोणत्याही अडचणी येणार नाही. ऑड-ईव्हन आणि नियमांबाबत व्यापाऱ्यांमधील संभ्रम संघटनांनी दूर केला आहे. पत्रपरिषदेत चेंबरचे सचिव रामअवतार तोतला, उपाध्यक्ष संजय अग्रवाल, फारुकभाई अकबानी, अर्जुनदास आहूजा, कोषाध्यक्ष सचिन पुनियानी, पीआरओ राजू माखिजा उपस्थित होते.लघु व मध्यम व्यापाऱ्यांना मदत पॅकेज द्यावेमेहाडिया म्हणाले, १९ मार्चपासून लॉकडाऊन आहे. यादरम्यान व्यापाऱ्यांची दुकाने बंद होती. १९ ते ३१ मेपर्यंत काही दुकाने सुरू झाली. आता ५ जूनपासून दुकाने उघडण्याची परवानगी मिळाली. लॉकडाऊनदरम्यान व्यापाऱ्यांचे ६ हजार कोटींचे नुकसान झाले आहे. अशा स्थितीत सरकारने लघु व मध्यम व्यापाऱ्यांना आर्थिक पॅकेजची घोषणा करावी.कोविड-१९ मध्ये व्यापाऱ्यांसाठी नियमसंचालक, कर्मचारी व ग्राहकांनी फेस मास्क घालणे आणि आरोग्य सेतू अ‍ॅप सुरू ठेवणे अनिवार्य आहे. संचालकांनी ग्राहकांसाठी दुकानात अतिरिक्त मास्क ठेवावेत.प्रतिष्ठानाच्या प्रवेशद्वारावर हात धुण्यासाठी सॅनिटायझरची व्यवस्था करावी.प्रतिष्ठानात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला हात धुणे आणि सॅनिटाईज्ड करणे अनिवार्य करावे.प्रतिष्ठानाच्या प्रवेशद्वारावर प्रत्येक व्यक्तीचे तापमान तपासावे. त्याचे नाव, मोबाईल क्रमांक आणि तापमानाची रजिस्टरमध्ये नोंद करावी.जर शक्य असेल तर प्रवेशद्वार कर्मचाऱ्यांनी उघडावे आणि प्रवेशद्वाराचे हॅण्डल वेळोवेळी सॅनिटाईज्ड करावे.प्रतिष्ठानात दोन व्यक्तींमध्ये एक वा दोन फुटाचे अंतर ठेवावे. गर्दी होऊ देऊ नये.प्रतिष्ठानाला सकाळ, दुपार आणि सायंकाळी सॅनिटाईज्ड करावे.प्रतिष्ठानात उपयुक्त प्रमाणात सॅनिटायझर उपलब्ध करावे.ग्राहकांनी खरेदी केलेली वस्तू बदलून देऊ नये.रिटेल काऊंटरच्या कर्मचाऱ्यांनी हॅण्डग्लोज घालावे.प्रतिष्ठानचा माल फूटपाथ वा रस्त्यावर ठेवू नये.कपड्यांच्या दुकानात ट्रायलरूमची सुविधा देऊ नये.दुकान आणि सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करू नये.

टॅग्स :Marketबाजारnagpurनागपूर