लोधा-सीतापार उपसा योजनेचा लाभ कधी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:10 IST2021-02-14T04:10:01+5:302021-02-14T04:10:01+5:30
देवलापार : रामटेक तालुक्यातील देवलापार आदिवासी विभागांतर्गत लोधा-सीतापार ही योजना बावनथडी नदीवर उपसा जलसिंचन योजना या आधारावर १३ वर्षांपूर्वी ...

लोधा-सीतापार उपसा योजनेचा लाभ कधी?
देवलापार : रामटेक तालुक्यातील देवलापार आदिवासी विभागांतर्गत लोधा-सीतापार ही योजना बावनथडी नदीवर उपसा जलसिंचन योजना या आधारावर १३ वर्षांपूर्वी पूर्णत्वास आली. परंतु उद्घाटनाच्या दिवशीच योजना बंद पडली. यासंदर्भात स्थानिक शेतकरी पाटबंधारे विभागाकडे पाठपुरावा करीत आहेत, परंतु अद्यापही योजना सुरू झाली नाही. यासंदर्भात जिल्हाधिकारी तसेच पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना अलीकडेच निवेदने देण्यात आली. यात उपसा सिंचन योजना लवकर कार्यान्वित करण्यात यावी, या योजनेसाठी विद्युत एक्स्प्रेस फिडरच्या माध्यमातून करण्यात यावा. कालव्यांची दुरुस्ती करण्यात यावी. यासोबतच स्थानिक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाठचाऱ्या करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात दोषी कंत्राटदार व अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी भाजपाच्या ग्रामविकास आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश ठाकरे यांनी केली. याप्रसंगी लक्ष्मण केने, राजेंद्र फुलवेल व परिसरातील शेतकरी उपस्थित होते.