शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरमध्ये पावसामुळे गव्हाच्या पिकाचे नुकसान; सर्वेक्षण व पंचनामे करणार कधी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 19:07 IST

Nagpur : सावनेर तालुक्यातील काही भागात गुरुवारी (दि. १९) मध्यरात्री कोसळलेल्या जोरदार वादळी अवकाळी पावसामुळे केळवद व जोगा तसेच परिसरातील शिवारातील कापणीला आलेल्या गव्हाच्या पिकासह भाजीपाल्याची पिके आणि संत्रा व मोसंबीच्या अंबिया बहाराचे प्रचंड नुकसान झाले.

लोकमत न्यूज नेटवर्ककेळवद : सावनेर तालुक्यातील काही भागात गुरुवारी (दि. १९) मध्यरात्री कोसळलेल्या जोरदार वादळी अवकाळी पावसामुळे केळवद व जोगा तसेच परिसरातील शिवारातील कापणीला आलेल्या गव्हाच्या पिकासह भाजीपाल्याची पिके आणि संत्रा व मोसंबीच्या अंबिया बहाराचे प्रचंड नुकसान झाले. या पावसाला चार दिवस होऊनही कृषी व महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी नुकसानग्रस्त पिकांचे सर्वेक्षण व पंचनामे केले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष व्यक्त होत आहे.

या पावसामुळे केळवद, रायबासा, बिडगाव, जटामखोरा, हत्तीसर्रा, कवठा, आष्टी, ढालगाव (खैरी), जलालखेडा, रामपुरी, पंढरी, नरसाळा, खापा (नरसाळा), जोगा, माळेगाव, खुर्सापार या शिवारातील कापणीला आलेला गहू, भाजीपाल्याच्या विविध पिकांचे मोठे नुकसान झाले असून, संत्रा व मोसंबीचा अंबिया बहार तसेच गावरान व कलमी आंबे गळाल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. महेंद्र वडकी यांच्यासह अन्य शेतकऱ्यांच्या शेतातील गव्हाचे उभे पीक आडवे झाल्याने नुकसान झाले.

वादळ व पावसामुळे काही शेतातील गव्हाचे पीक कापणीयोग्य राहिले नाही. काहींनी त्या पिकाची कापणी व मळणी जरी केली तरी गव्हाचा दर्जा खालावला असून, ओलाव्यामुळे दाणे काळवंडल्यागत झाले आहेत. या नुकसानीची कृषी व महसूल विभागातील अधिकाऱ्यांना शुक्रवारी सकाळी माहिती देण्यात आली. मात्र, चार दिवस पूर्ण होऊनही कुणीही या नुकसानग्रस्त शेतातील पिकांची पाहणी व पंचनामा केला नाही, अशी माहिती या भागातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.

तत्काळ पंचनामे करा, भरपाई द्या

प्रशासनाने या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावे तसेच राज्य सरकारने नुकसानग्रस्तांना लगेच योग्य नुकसान भरपाई जाहीर करून ती बँक खात्यात जमा करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली असून, आंदोलनाचा इशारा दिला आहे.

काही शेतातील पीक हिरवेच

काही शेतकऱ्यांनी गव्हाच्या पिकाची उशिरा पेरणी केल्याने त्यांच्या शेतातील पीक हिरवे असून, ओब्यांमधील दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. पावसामुळे हे पीक भुईसपाट झाल्याने ते परिपक्व होणार नाही. बहुतांश शेतकऱ्यांनी हरभऱ्याच्या पिकाची आधीच कापणी व मळणी केल्याने या पिकाचे मात्र फारसे नुकसान झाले नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : Nagpur Wheat Crop Damaged by Rain; Survey and Assessment Delayed.

Web Summary : Heavy rain in Nagpur damaged wheat, vegetables, and orange crops. Farmers are angry as agricultural and revenue departments haven't surveyed the damage or started assessment, even after four days. Farmers demand immediate assessments and compensation from the government.
टॅग्स :WheatगहूCropपीकGovernmentसरकारFarmerशेतकरीfarmingशेतीnagpurनागपूर