शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

नागपुरात कोरोनाचा उद्रेक झालाच तर? १८३ लोकांमागे एकच खाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 10:30 IST

सध्या कोरोना विषाणूच्या संशयित रुग्णांची संख्या वाढत आहे. दुर्दैवाने उद्रेक झाल्यास धन्वंतरीचे पाईक रुग्णसेवेसाठी तत्पर असतील, पण सेवा देणारे कुठे, हा प्रश्न आहे.

ठळक मुद्दे २६ लाख लोकसंख्येच्या तुलनेत १४ हजार २०७ खाटा

सुमेध वाघमारे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहर वाढत आहे. सध्या नागपूरची लोकसंख्या २६ लाखांच्या घरात आहे. त्या तुलनेत मेयो, मेडिकल, सुपर स्पेशालिटी व डागासह खासगी इस्पितळांची संख्या ६३३ असून खाटांची संख्या १४ हजार २०७ आहे. त्यानुसार १८३ नागरिकांमागे एक खाट असे प्रमाण येत आहे. उपलब्ध खाटांपैकी बहुसंख्य खाटा विविध आजारांच्या रुग्णांनी फुल्ल आहेत. सध्या कोरोना विषाणूच्या संशयित रुग्णांची संख्या वाढत आहे. दुर्दैवाने उद्रेक झाल्यास धन्वंतरीचे पाईक रुग्णसेवेसाठी तत्पर असतील, पण सेवा देणारे कुठे, हा प्रश्न आहे.शहरात मनपाचे ३७ दवाखाने, १२ हेल्थ पोस्ट व १० माता-बाल संगोपन केंदे्र आहेत. यातील महापालिकेच्या पाचपावली दवाखान्यात १०, गांधीनगर येथील इंदिरा गांधी रुग्णालयात ८० तर इमामवाडा येथील आयसोलेशन दवाखान्यात ४० खाटा अशा एकूण १३० रुग्णांसाठी खाटांची व्यवस्था आहे. या शिवाय, मेडिकल, ट्रॉमा केअर सेंटर व सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमिळून २२५०, मेयोमध्ये ७५०, डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयात ५५० व खासगी इस्पितळेमिळून १० हजार ५२७ आहेत. यांची बेरीज केल्यास ही संख्या १४ हजार २०७ वर जाते. १८३ लोकामागे फक्त एक खाट हे प्रमाण योग्य नसल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञाचे म्हणणे आहे.मेयो, मेडिकलमध्ये यापेक्षा खाटा वाढणे अशक्यचसध्या शहरात कोरोना विषाणूचे चारच रुग्ण असलेतरी रोज सुमारे २०वर संशयित रुग्ण दाखल होत आहेत. या रुग्णांसाठी मेयोमध्ये २० तर मेडिकलमध्ये ४० खाटा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. मेडिकल आणखी ३० खाटांचा वॉर्ड उपलब्ध करून देणार आहे. परंतु त्यांच्यावर इतरही रुग्णांचा भार असल्याने त्यांना मर्यादा येणार आहेत. मेयोमध्ये तर ब्रिटिशकालीन जुन्या सर्व इमारती पाडण्याचा सूचना आहेत, त्यामुळे त्यांनाही खाटा उपलब्ध करून देणे शक्य होणार नसल्याचे वास्तव आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस