शरद पवारांनी नितीन गडकरींना मोबाईलमध्ये काय दाखवले? उपस्थितांमध्ये कुतूहलवजा चर्चा
By कमलेश वानखेडे | Updated: July 15, 2022 22:08 IST2022-07-15T21:32:17+5:302022-07-15T22:08:47+5:30
Nagpur News शरद पवार आणि नितीन गडकरी एका व्यासपीठावर जवळ बसले असताना दोघेही पवारांच्या मोबाईलमध्ये पहात काहीतरी बोलत असल्याचे दृष्य उपस्थितांच्या भुवया उंचावणारे ठरले.

शरद पवारांनी नितीन गडकरींना मोबाईलमध्ये काय दाखवले? उपस्थितांमध्ये कुतूहलवजा चर्चा
कमलेश वानखेडे
नागपूरः शरद पवार आणि नितीन गडकरी एका व्यासपीठावर जवळ बसले असताना दोघेही पवारांच्या मोबाईलमध्ये पहात काहीतरी बोलत असल्याचे दृष्य उपस्थितांच्या भुवया उंचावणारे ठरले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे कृषी विकास प्रतिष्ठानच्या कार्यक्रमासाठी शुक्रवारी नागपुरात आले. देशपांडे सभागृहातील या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर शरद पवार व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी शेजारी बसले होते. या दोन्ही नेत्यांमध्ये असलेली राजकारणापलीकडील मैत्री सर्वश्रुत आहे.
या कार्यक्रमात दोन्ही नेते बराच वेळ गप्पांमध्ये रंगले होते. कधी पवार वाकून गडकरींच्या कानाशी काहीतरी बोलायचे, तर कधी गडकरी. चर्चेत रंगले असताना पवार यांनी स्वत:चा मोबाईल काढला त्यातील काहीतरी गडकरींना दाखवले. गडकरींनी मोबाइल जवळ घेऊन पाहिले. समोर उपस्थित सर्वजण हे लक्ष केंद्रित करून पाहत होते. पवारांनी गडकरी यांना आपल्या मोबाइलमध्ये नक्की काय दाखवले, अशी एकच कुजबुज यानिमित्ताने उपस्थितांमध्ये सुरू झाली होती.