शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
2
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
3
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
4
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
6
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
7
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
8
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
9
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
10
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
11
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
12
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
13
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
14
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
15
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
16
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
17
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
18
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
19
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
20
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?

सार्वजनिक भूखंड दुरुपयोगाच्या अहवालावरून काय कारवाई केली

By admin | Updated: April 12, 2015 02:39 IST

उपराजधानीतील सार्वजनिक भूखंडांच्या दुरुपयोगामुळे शासनाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याची बाब महालेखाकार (लेखापरीक्षण) यांच्या ...

नागपूर : उपराजधानीतील सार्वजनिक भूखंडांच्या दुरुपयोगामुळे शासनाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याची बाब महालेखाकार (लेखापरीक्षण) यांच्या अहवालामुळे प्रकाशात आली आहे. या अहवालानंतर संबंधित भूखंड लाभधारकांविरुद्ध काय कारवाई करण्यात आली अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी करून यासंदर्भात नागपूर सुधार प्रन्यास व महानगरपालिकेला २४ एप्रिलपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिलेत.याविषयी चेतन राजकारणे यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने २३ जुलै २०१४ रोजी प्रतिवादींना नोटीस बजावली होती. यानंतर प्रतिवादींच्या विनंतीवरून याचिकेवरील सुनावणी वारंवार तहकूब करण्यात आली पण, कोणीच उत्तर सादर केले नाही. न्यायालयाने याची गंभीर दखल घेतली. याचिकेतील माहितीनुसार, १९९४ मध्ये नंदनवन येथील सीडी/२ क्रमांकाचा प्लॉट अमर सेवा मंडळाला शैक्षणिक उपयोगासाठी देण्यात आला होता. या प्लॉटवर गोविंद सभागृह व गोविंद लॉन सुरू करण्यात आले आहे. अलंकार चित्रपटगृहापुढील वानखडे सभागृहाची जागा वसतीगृह व सांस्कृतिक सभागृहासाठी देण्यात आली होती. या जागेचा व्यावसायिक उपयोग केला जात आहे. १९६२ मध्ये महात्मा फुले शिक्षण संस्थेला विद्यार्थी वसतीगृह बांधण्यासाठी दिलेल्या मानेवाडा रोडवरील जागेवर लग्नाचे सभागृह उभारण्यात आले आहे. नंदनवन येथील खसरा क्र. ५९० व ५९८ ही जागा जोतिबा माध्यमिक विद्यालयाला अवैधपणे देण्यात आली आहे. डेमॉक्रेटिक युथ फेडरेशन आॅफ इंडिया, नवनिर्माण नागपूर कृती समिती व नागपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमेटी यांनाही अवैधपणे भूखंड देण्यात आले आहेत. मराठा विद्या प्रसारक मंडळ, जैन कलार सोसायटी, सिंधू समाज, माथाडी हमाल वर्कर्स फेडरेशन, परमात्मा एक सेवक मंडळ हे सार्वजनिक भूखंडाचा व्यावसायिक उपयोग करीत असल्याचे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. याप्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची त्यांची विनंती आहे.(प्रतिनिधी)