शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

हातावर पोट असणाऱ्यांचे काय? : रोजंदारी कामगारांची उपासमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 21:28 IST

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन प्रशासन आपल्या परीने सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. गर्दीत एकमेकांच्या संपर्कात येऊन संसर्गाचा धोका लक्षात घेता संचारबंदी लावण्यात आली मात्र हातावर पोट असलेल्या रोज कमावून खाणाऱ्यांचे काय, हा भीषण प्रश्न निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देकोरोनाचा सर्वाधिक फटका असंघटित कामगारांना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन प्रशासन आपल्या परीने सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. गर्दीत एकमेकांच्या संपर्कात येऊन संसर्गाचा धोका लक्षात घेता संचारबंदी लावण्यात आली असून लोकांनी कामावर न जाता घरी बसणे हेच मोठे योगदान आज ठरत आहे. कंपन्या, कारखाने, ऑफीस, सर्वच बंद, रोजची कामेही बंद झाली आहेत. ही परिस्थितीची गरजेही आहे. मात्र हातावर पोट असलेल्या रोज कमावून खाणाऱ्यांचे काय, हा भीषण प्रश्न निर्माण झाला आहे. या परिस्थितीचा सर्वाधिक फटका या असंघटित कामगारांनाच बसत आहे. काम बंद झाल्याने घरी बसून आहेत. तेव्हा जगणार कसे? खाणार काय? कुटुंबाचे काय? असे अनेक प्रश्न यांच्यापुढे आवासून उभे आहेत.देशातील असंघटित कामगारांचे प्रमाण तब्बल ९३ टक्के इतके आहे. यात घरकाम करणाऱ्या मोलकरणी, बांधकाम मजूर, कारखान्यात काम करणारे कामगार, वीटभट्टीवर काम करणारे मजूर, लहान दुकानात काम करणारे, हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये काम करणारे, बिल्डरकडे काम करणारे, छोट्या ऑफीसमध्ये काम करणारे आदींचा यात समावेश होतो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या सर्वांचेच काम एका झटक्यात सुटले. शासनाने कितीही सांगितले की अशा लोकांचे वेतन कापू नये, कामगार विभागाने जी.आर. सुद्धा जारी केला की कोणत्याही मजुराचे किंवा कामगारांचे वेतन कापल्या जाणार नाही. परंतु याचे पालन किती होणार? हा मुख्य मुद्दा आहे. घरच्या मोलकरणीला पगारी सुटी देणारे कितीजण असतील, हाही मुख्य प्रश्न आहे. ३१ तारखेपर्यंत ही मंडळी घरी राहणार. परिस्थिती आटोक्यात आली तर ठीक अन्यथा समोरची स्थिती यापेक्षा भीषण असण्याची शक्यता नाकारता येत नाही. यादरम्यान त्यांच्याकडे पैसे असण्याचा प्रश्नच येत नाही. काही सामाजिक संघटना पुढाकार घेऊन रस्त्यावरीच गरीब, निराधारांची मदत करीत आहेत. परंतु या असंघटित कामगारांकडे सध्या तरी दुर्लक्ष आहे. तेव्हा अशांसाठी शासनानेच पुढाकार घेण्याची गरज आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याLabourकामगार