शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

नागपुरात ओला कचरा, सुका कचरा’ विलगीकरणाला हरताळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 01:11 IST

शहराच्या स्वच्छताकरणाची यंत्रणा योग्य तऱ्हेने कार्यान्वित व्हावी आणि कचरा विलगीकरणात सुटसुटीतपणा असावा म्हणून थेट नागरिकांच्या घरातूनच कचरा संकलानात ओला कचरा, सुका कचरा स्वीकारण्याचे कार्य सुरू झाले. सुरुवातीच्या संभ्रमानंतर नागरिकांनी कचरा विलगीकरणाच्या या प्रक्रियेला उत्तम प्रतिसाद देण्यास सुरुवात केली. मात्र, आता कचरा घेण्यास येणाऱ्या स्वच्छता दूतांकडूनच या प्रक्रियेला हरताळ फासण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहराच्या स्वच्छताकरणाची यंत्रणा योग्य तऱ्हेने कार्यान्वित व्हावी आणि कचरा विलगीकरणात सुटसुटीतपणा असावा म्हणून थेट नागरिकांच्या घरातूनच कचरा संकलानात ओला कचरा, सुका कचरा स्वीकारण्याचे कार्य सुरू झाले. सुरुवातीच्या संभ्रमानंतर नागरिकांनी कचरा विलगीकरणाच्या या प्रक्रियेला उत्तम प्रतिसाद देण्यास सुरुवात केली. मात्र, आता कचरा घेण्यास येणाऱ्या स्वच्छता दूतांकडूनच या प्रक्रियेला हरताळ फासण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ‘टाकाऊ पदार्थ ही सर्वोत्तम गुंतवणूक (वेस्ट यूज फॉर बेस्ट)’ ही संकल्पना वेळोवेळी आपल्या जाहीर भाषणांतून बोलून दाखवली. कचऱ्यातून वीजनिर्मिती आणि इतर अनेक उपक्रम राबविण्यात येऊ शकतात, यावर त्यांचा जोर आहे. त्याच हेतूने कचरा विलगीकरणाची प्रक्रिया थेट घरातूनच व्हावी आणि याची नागरिकांना सवय लागावी या हेतूने नागपूर महानगर पालिकेने ‘ओला कचरा, सुका कचरा’ अशी प्रक्रिया राबविण्यास सुरुवात केली. सुरुवातीचे काही महिने वगळता नागरिक आता स्वत:च दोन प्रकारचा कचरा दोन बकेटमध्ये साठवून ठेवतात आणि मनपाच्या सफाई कर्मचाऱ्यांच्या हाती दररोज सोपवत आहेत. महापालिकेच्या गाड्यांमध्येही ओला व सुका कचºयाचे दोन भाग पाडण्यात येऊन त्याना हिरवा व निळा रंग देण्यात आला आहे. त्याअनुषंगाने नागरिक ‘गाडी वाला आया घर से कचरा निकाल’ हे गाण्याचे स्वर कानावर पडताच घरातून कचऱ्याच्या दोन बकेट घेऊन दारावर पोहोचतात आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या हाती सोपवतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या प्रक्रियेत बराच संभ्रम निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. नागरिक ओला व सुका कचऱ्याच्या दोन बकेट स्वच्छता कर्मचाऱ्यांना देत असले तरी कर्मचारी मात्र कचऱ्यामध्ये विलगीकरण करत नसल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. दोन बकेट एकाच ठिकाणी रिकाम्या केल्या जात आहेत. जर एकाच ठिकाणी दोन्ही प्रकारचा कचरा टाकला जात असेल तर मग ओला व सुका कचरा असा फरक नागरिकांनाच का करायला सांगितल्या जात आहे, असा सवाल नागरिकांमध्ये निर्माण व्हायला लागला आहे.कचरा संकलन गाड्या मोडकळीस!गेले दोन वर्षे ही प्रक्रिया योग्य तऱ्हेने पार पाडत असताना कचरा संकलन करणाºया गाड्यांची स्थितीच मोडकळीस आल्याचे दिसून येते. ओला व सुका असे एकाच गाडीत दोन भाग करण्यात आले आहे. मात्र, गाडीचे दोन भाग करणारी मधली टिनेची भिंतच तुटली असल्याने कचरा संकलन करताना दोन्ही प्रकारचा कचरा मिसळत आहे. शिवाय, गाडीला स्वतंत्रपणे दोन वेगळ्या मोठ्या बकेट्स आहेत. मात्र, एका भागातील संपूर्ण कचरा त्यात सामावला जाऊ शकत नाही. त्यामुळे आमचा नाईलाज असल्याचे नाव न सांगण्याच्या अटीवरून कर्मचाºयांनी सांगितले.गती कशी मिळणार?सुरुवातीला शहराच्या काठावर असलेल्या भांडेवाडी येथे कचºयाचे भले मोठे ढीग निर्माण झाले आहे. आता हे ठिकाण शहरात आले आहे. कचºयाचा उपयोग करता आला तर अशा ढिगाऱ्यापासून शहराला मुक्ती मिळेल, या हेतूने ओला व सुका कचरा स्विकारण्याची पद्धत अमलात आली. घरातूनच असे विलगीकरण झाले तर शासकीय कर्मचाऱ्यांचा वेळ वाचेल आणि गती वाढेल, हा हेतू त्या मागचा आहे. मात्र, गाड्यांच्या अव्यवस्थेमुळे आणि अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असल्यामुळे पुन्हा कचरा संकलनाची ही पद्धत मोडकळीस आल्याचे दिसून येते.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाGarbage Disposal Issueकचरा प्रश्न