शाब्बास! 'तिने' हिंमतीने त्याला मारली लाथ आणि वाचवला जीव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 15:57 IST2021-05-24T15:53:09+5:302021-05-24T15:57:32+5:30
Nagpur News वडिलांनी बोलविल्याची थाप मारून कारमध्ये बसविल्यानंतर आरोपीने एका केअर टेकरवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. पीडित तरुणीने न घाबरता त्या भामट्याला जोरदार लाथ हाणली आणि त्याच्या तावडीतून सुटका करून घेतली.

शाब्बास! 'तिने' हिंमतीने त्याला मारली लाथ आणि वाचवला जीव
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वडिलांनी बोलविल्याची थाप मारून कारमध्ये बसविल्यानंतर आरोपीने एका केअर टेकरवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. पीडित तरुणीने न घाबरता त्या भामट्याला जोरदार लाथ हाणली आणि त्याच्या तावडीतून सुटका करून घेतली.
एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी सकाळी ९.३० च्या सुमारास ही घटना घडली. आरोपीचे नाव सोनू आहे. पीडित २७ वर्षीय तरुणी होम पेशंट केअर टेकरचे काम करते. सोमवारी सकाळी तिच्या घरी सोनू नामक आरोपी पोहोचला. वडिलांनी बोलविले आहे, असे सांगून त्याने तिला आपल्या कारमध्ये बसविले. एकांत स्थळी कार थांबवून त्याने तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. पीडित तरुणीने स्वत:चा बचाव करण्यासाठी आरोपीला जोरदार लाथ हाणली आणि कारचे दार उघडून बाहेर पडली. आरोपीने तिचा पाठलाग केला आणि झालेली घटना कोणाला सांगितली तर जीवे ठार मारेन, अशी धमकी दिली. त्याच्या धमकीला भीक न घालता तिने सरळ पोलीस ठाणे गाठले. झालेली घटना पोलिसांना ऐकवली. पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध घेतला जात आहे.