गृहमंत्री अमित शाह यांचे नागपूर विमानतळावर स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2023 21:57 IST2023-03-25T21:57:18+5:302023-03-25T21:57:47+5:30

Nagpur News केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे नागपूर विमानतळावर आज प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वागत केले. दुपारी तीनच्या सुमारास त्यांचे नागपूर विमानतळावर सीमा सुरक्षा दलाच्या विमानाने आगमन झाले.

Welcome to Home Minister Amit Shah at Nagpur Airport | गृहमंत्री अमित शाह यांचे नागपूर विमानतळावर स्वागत

गृहमंत्री अमित शाह यांचे नागपूर विमानतळावर स्वागत

नागपूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे नागपूर विमानतळावर आज प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वागत केले. दुपारी तीनच्या सुमारास त्यांचे नागपूर विमानतळावर सीमा सुरक्षा दलाच्या विमानाने आगमन झाले. त्यानंतर ते छिंदवाडा येथील कार्यक्रमासाठी विमानतळावरूनच रवाना झाले.
         

मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ते आले होते. विमानतळावर जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी, सह पोलीस आयुक्त अश्विनी दोरजे, विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ. छेरिंग दोरजे, गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील यांच्यासह पोलीस व अन्य विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. नागपूर विमानतळावरून विशेष हेलीकॅप्टरने ते छिंदवाडाकडे रवाना झाले.

Web Title: Welcome to Home Minister Amit Shah at Nagpur Airport