हेल्मेट वापरणाºयांचे डॉक्टरांनी केले स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 00:28 IST2017-11-14T00:27:48+5:302017-11-14T00:28:03+5:30
भारतात रस्ता अपघाताचे प्रमाण मोठे आहे. यात जखमी होणाºया वाहनधारकांमध्ये १५ ते २९ वर्षीय युवकांची संख्या सर्वाधिक आहे.

हेल्मेट वापरणाºयांचे डॉक्टरांनी केले स्वागत
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारतात रस्ता अपघाताचे प्रमाण मोठे आहे. यात जखमी होणाºया वाहनधारकांमध्ये १५ ते २९ वर्षीय युवकांची संख्या सर्वाधिक आहे. हेल्मेट घालून दुचाकी चालविल्यास ४० टक्के तर सीट बेल्ट घालून चारचाकी वाहन चालविल्यास अपघातात गंभीर जखमी होण्याचा धोका ७० पटीने कमी होतो. याच्या जनजागृतीला घेऊन शहरातील दंत शल्यचिकित्सकांनी सोमवारी लॉ कॉलेज चौकात वाहतूक सिग्नलवर थांबलेल्या व हेल्मेट घालून असणाºया आणि सीट बेल्ट बांधलेल्या सुमारे २५०० वाहनचालकाचे पुष्प व सुरक्षित वाहतुकीचा संदेश देऊन स्वागत केले.
‘क्रॅनिओ व मॅक्सिलोफेशियल सर्जरी’ परिषद १६ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. त्या निमित्ताने करण्यात आलेल्या या जनजागृतीने नागपूरकरांचे लक्ष वेधले. यावेळी वरिष्ठ वाहतूक पोलीस निरीक्षक जयेश भांडारकर, परिषदेचे आयोजन अध्यक्ष डॉ. रामक्रिष्ण शेनॉय, सचिव डॉ. अभय दातारकर, डॉ. अनुप गर्ग, डॉ. नीरज खरे, डॉ. मधुमती धावडे, डॉ. नीलिमा अग्रवाल, डॉ. राहुल डहाके यांच्यासह शासकीय दंत महाविद्यालयाच्या विद्यार्थी असोसिएशन व व्हीएसपीएम दंत महाविद्यालय विद्यार्थी असोसिएशनचे विद्यार्थी मोठ्या संख्येत उपस्थित होते.
‘लोकमत’शी बोलताना डॉ. दातारकर म्हणाले, दुचाकी चालविताना हेल्मेटमुळे मेंदू व चेहºयाचे रक्षण होते. विशेषत: चेहरा हा शरीराचा सर्वात जास्त उघडा भाग असतो. विना हेल्मेट वाहनचालकाचा अपघात झाल्यास चेहºयाचे विविध हाडे, दात तसेच चेहºयाचे मृदु पेशीजाल यांना दुखापत होते. विशेषत: खालच्या जबड्याच्या हाडांचा अस्थिभंग हा सर्वात जास्त होतो.
डॉ. शेनॉय म्हणाले, विना हेल्मेट वाहन चालविणाºया चालकाच्या चेहºयाच्या आघाताबरोबर डोक्याच्या आणि मेंदूच्या दुखापतीचा संंबंध सर्वात जास्त असतो. मुख्यत: जेव्हा आघात चेहºयाच्या मध्यभागी होतो. ‘मॅक्सिलोफेशियल’आघातामध्ये मेंदूची दुखापत होण्याचे प्रमाण १५.४८ टक्के असते. यामुळे हेल्मेट घालूनच वाहन चालवावे, असेही ते म्हणाले. यावेळी जयेश भांडारकर यांनी डॉक्टरांनी केलेल्या जनजागृती कार्याचे कौतुक केले.