शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

एका टीसीवर १३ कोचचा भार

By admin | Updated: January 16, 2017 01:51 IST

रेल्वेगाड्यांची संख्या दरवर्षी वाढत असून, त्यात काम करणाऱ्या टीसींची संख्या मात्र मागील अनेक

तोकड्या संख्येंची प्रवाशांना डोकेदुखी : नागपूर विभागात ६०० टीसींची आवश्यकता दयानंद पाईकराव   नागपूर रेल्वेगाड्यांची संख्या दरवर्षी वाढत असून, त्यात काम करणाऱ्या टीसींची संख्या मात्र मागील अनेक वर्षांपासून वाढली नसल्यामुळे प्रवाशांच्या समस्यांत मोठी वाढ झाली आहे. एका टीसीला १३ कोच सांभाळण्याची कसरत करावी लागत आहे. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात सध्या १२०० टीसींची गरज असताना केवळ ६२५ टीसी कार्यरत आहेत. रेल्वे बोर्डाने टीसीला उत्पन्न वाढविण्याचे ‘टार्गेट’ वाढवून दिले. परंतु हे ‘टार्गेट’ पूर्ण करताना प्रवाशांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत आहे. गाडीत एकच टीसी असल्यामुळे अनेक प्रवासी विनातिकीट प्रवास करीत असून, रेल्वे प्रशासनाच्या महसुलाचेही मोठे नुकसान होत असल्याची धक्कादायक माहिती आहे. रेल्वेगाडी आपल्या नियोजित ठिकाणावरून सुटल्यानंतर प्रवासी आणि टीसी यांचा ताळमेळ असणे गरजेचे असते. परंतु मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात टीसींची संख्या दुपटीने कमी आहे. यामुळे एका टीसीला १२ ते १३ कोच सांभाळण्याची वेळ आली आहे. प्रवाशांना प्रवासात अनेक समस्या येतात. रेल्वेगाडी कधी अस्वच्छ असते. प्रवासी अनेकदा चेनपुलिंग करतात. कधी असामाजिक तत्त्व प्रवाशांच्या बर्थचा ताबा मिळवितात. कधी प्रवाशांची प्रकृती बिघडल्यास टीसीच पुढील स्थानकावर कळवून डॉक्टरची सुविधा उपलब्ध करून देतो. परंतु टीसीला रेल्वे बोर्डाने उत्पन्नाचे टार्गेट वाढवून दिल्यामुळे तो आपले टार्गेट पूर्ण करण्यात व्यस्त असतो. प्रवाशांच्या समस्यांकडे लक्ष देण्यास त्याला वेळच मिळत नाही. अशा स्थितीत प्रवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे रेल्वेगाड्यातील टीसींची संख्या वाढविण्याची मागणी प्रवासी करीत आहेत.