काेराेना संक्रमणातही भरला आठवडी बाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:08 IST2021-04-13T04:08:53+5:302021-04-13T04:08:53+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : काेराेना संक्रमण वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने नागपूर जिल्ह्यात आठवडी बाजार भरण्यावर काही काळासाठी बंदी ...

The week market also filled with Carina transitions | काेराेना संक्रमणातही भरला आठवडी बाजार

काेराेना संक्रमणातही भरला आठवडी बाजार

लाेकमत न्यूज नेटवर्क

रामटेक : काेराेना संक्रमण वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने नागपूर जिल्ह्यात आठवडी बाजार भरण्यावर काही काळासाठी बंदी घातली आहे. त्याअनुषंगाने काचूरवाही (ता. रामटेक) ग्रामपंचायत प्रशासनाने गावात दवंडी देऊन आठवडी बाजार भरणार नाही, अशी वेळावेळी सूचना दिली हाेती. मात्र, नागरिकांनी या दंवडीकडे व प्रशासनाच्या आवाहनाकडे दुर्लक्ष करीत आठवडी बाजार भरवला. एवढेच नव्हे तर बाजारात काेराेना प्रतिबंधक उपाययाेजनांचा फज्जाही उडवण्यात आला.

काचूरवाही येथे रविवारी आठवडी बाजार भरताे. या बाजारात स्थानिक व परिसरातील काही गावांमधील नागरिक भाजीपाला व इतर वस्तूंची खरेदी करण्यासाठी येतात. दरम्यान, दुसऱ्या टप्प्यातील काेराेना संक्रमणात वाढ हाेत असल्याने जिल्हा प्रशासनाने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ व साथराेग प्रतिबंधक अधिनियम १८९७ अन्वये जिल्ह्यातील आठवडी बाजारांवर काही काळासाठी बंदी घातली आहे. रामटेक तालुक्यात काेराेना संक्रमण वाढत असल्याने तालुक्यात कुठेही आठवडी बाजार भरवू नये, अशा सूचनाही तहसीलदार बाळासाहेब मस्के यांनी ग्रामपंचायत प्रशासनाला दिल्या आहेत. त्याअनुषंगाने काचूरवाही ग्रामपंचायत प्रशासनाने गावात वेळावेळी दवंडी देऊन बाजार भरणार नाही, अशा सूचनाही नागरिकांना दिल्या हाेत्या.

काचूरवाही येथेही काेराेना रुग्णांची संख्या हळूहळू वाढत आहे. त्यातच स्थानिक नागरिकांनी ग्रामपंचायत प्रशासनाच्या दवंडीकडे दुर्लक्ष करीत गावात रविवारऐवजी साेमवारी (दि. १२) आठवडी बाजार भरवला हाेता. या बाजारात बाहेरगावाहून भाजीपाला विक्रेते व खरेदीसाठी नागरिक आले हाेते. विक्रेत्यांनी त्यांची दुकाने गावातील मुख्य चाैकात राेडलगत थाटली हाेती. बाजारातील बहुतांश नागरिक विना मास्क फिरत हाेते तर कुणीही फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करीत नव्हते. ही बाब प्रशासनाला माहिती असूनही कुणीही कारवाई करण्याची तसदी घेतली नाही.

...

नागरिकांचा बेजबाबदारपणा धाेकादायक

काचूरवाही येथे सर्दी, ताप, खाेकला, अंगदुखी, मळमळ वाटणे ही लक्षणे असलेले रुग्ण घराेघरी आहेत. गावातील व रामटेक शहरातील खासगी दवाखानेही फुल आहेत. एवढे असूनही नागरिक काेराेना प्रतिबंधक उपाययाेजनांचे पालन करीत नाही. प्रशासनाने सूचना देऊनही त्याचे पालन करीत नाही. मास्क न वापरणे, आजारपणात कुठेही फिरणे, चाैकात व सार्वजनिक ठिकाणी गटागटाने गप्पा करीत बसणे, कुठेही थुंकणे या बाबी आजूनही दिसून येत आहेत. नागरिकांचा हा बेजबाबदारपणा त्यांच्यासह इतरांच्या अंगलट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या बेजबाबदार नागरिकांना वठणीवर आणण्यासाठी त्यांच्यावर माेठ्या रकमेची दंडात्मक कारवाई करणे आवश्यक असल्याची प्रतिक्रिया सुज्ञ नागरिकांनी व्यक्त केली.

Web Title: The week market also filled with Carina transitions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.