शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री! आजपासून तिकीट दरवाढ लागू; जाणून घ्या तुमचे तिकीट किती रुपयांनी महागले?
3
मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना देखील मेरी ख्रिसमस; नायजेरियात ISIS वर बॉम्ब हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २६ डिसेंबर २०२५: आनंद व उत्साहाचे वातावरण; कामात यश मिळेल!
5
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
6
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
7
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
8
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
9
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
10
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
11
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
12
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
13
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
14
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
15
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
16
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
17
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
18
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
19
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
20
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
Daily Top 2Weekly Top 5

कमजोर प्रतिकारक्षमता आणि उपचारातील दिरंगाईने वाढला मृत्यूदर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 23:50 IST

Corona Virus mortality कोराेना संक्रमित आणि संकमणातून बाहेर पडणाऱ्या रुग्णांच्या फुफ्फुसात रक्ताच्या गुठळ्या जमा होत असल्याचे प्रकार,  हृदय आणि फुफ्फुस बंद पडत असल्याने मृत्यू वाढत आहेत. मात्र नागपुरात होणारे मृत्यू हे कमजोर प्रतिकार क्षमता व भीतीमुळे उपचारात होणारी दिरंगाई या कारणामुळे होत असल्याचे निदर्शनास येत आहेत.

ठळक मुद्देरक्ताच्या गुठळ्या जमा होण्याच्या घटनांत वाढ

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोराेना संक्रमित आणि संकमणातून बाहेर पडणाऱ्या रुग्णांच्या फुफ्फुसात रक्ताच्या गुठळ्या जमा होत असल्याचे प्रकार,  हृदय आणि फुफ्फुस बंद पडत असल्याने मृत्यू वाढत आहेत. मात्र नागपुरात होणारे मृत्यू हे कमजोर प्रतिकार क्षमता व भीतीमुळे उपचारात होणारी दिरंगाई या कारणामुळे होत असल्याचे निदर्शनास येत आहेत. आतापर्यंत झालेल्या मृत्यूंमध्ये ५० वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या मृत्यूंची टक्केेवारी ६० पेक्षा अधिक असल्याचे सांगितले जात आहे. सध्या नागपूर जिल्ह्यात रोज ५० ते ५५ मृत्यू होत आहेत. ८५ टक्के रुग्णांमध्ये संक्रमणाची कसलीही लक्षणे दिसत नसल्याचे आतापर्यंतच्या पाहणीत आढळून आले आहे. मात्र ज्यांच्यामध्ये ही लक्षणे दिसत नाहीत, त्यांनी विशेष सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. आजारातून दुरुस्त झाल्यावर नियमित आरोग्य तपासणी करण्याची गरज आहे. ६ टक्के रुग्ण गंभीर होतात. हे विषाणू रक्तवाहिन्या, फुफ्फुस, हृदयाला नुकसान पोहचवतात. ऑक्सिजनचा स्तर कमी झाल्याने शरीरावर विपरीत परिणाम पडतो. ‘लोकमत’ने शहरातील काही विशेषज्ञांसोबत चर्चा करून मृत्यूची कारणे जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

मृत्यूची कारणे

- मधुमेह, रक्तदाबाची समस्या

- हृदय, फुफ्फुस व किडनीचे आजार

- उपचार करण्यात होत असलेला विलंब

- ५० वर्षांवरील व्यक्तींमध्ये असणारी कमी प्रतिकारक्षमता

- रक्ताच्या गुठळ्या जमा झाल्याने हृदय व फुफ्फुस बंद पडण्याचे प्रकार

रक्त पातळ करण्याचे औषध : केवलिया

मेयो रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया म्हणाले, कोविड रुग्णांना रक्त पातळ होण्याचे औषध दिले जाते. विषाणू रक्रवाहिन्यात गेल्याने नुकसान करतात. यामुळे सतर्कता बाळगायला हवी.

लक्षणे नसणाऱ्यांनी सावध राहावे : जगताप

हृदयरोग विशेषज्ञ डॉ. प्रशांत जगताप म्हणाले, लक्षण नसणाऱ्यांमध्ये दीड महिन्यांनी क्लॉटिंग होणे दिसायला लागते. यामुळे हृदय, फुफ्फुस बंद पडणे असे प्रकार आढळतात. मात्र हे प्रमाण कमी आहे.

असा करतात परिणाम

मानवी शरीरातील फुफ्फुसामध्ये ऑक्सिजन घेऊन कार्बनडाय ऑक्साईड बाहेर सोडला जातो.मात्र कोरोनामुळे तयार झालेल्या लहान लहान एअरसॅकमुळे त्यात पाणी जमा व्हायला लागते. त्यामुळे श्वास घेता येत नाही. परिणामत: ऑक्सिजन लावावा लागतो.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू