शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
4
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
5
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
6
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
7
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
8
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
9
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
10
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
11
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
12
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
13
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
14
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
15
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
16
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
17
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
18
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
19
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
20
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
Daily Top 2Weekly Top 5

उपमुख्यमंत्र्यांनी सांगितल्यावरच वीजबिलमाफीबाबत बोललो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : वीजबिलांच्या माफीवरून राज्यातील राजकारण तापले असताना राज्यातील मंत्री अशोक चव्हाण यांनी सरकारकडूनच ही चूकच ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : वीजबिलांच्या माफीवरून राज्यातील राजकारण तापले असताना राज्यातील मंत्री अशोक चव्हाण यांनी सरकारकडूनच ही चूकच झाली, असे वक्तव्य केले होते. यासंदर्भात ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी आता उपमुख्यमंत्र्यांकडे बोट दाखविले आहे. पहिल्या बैठकीत अशोक चव्हाण उपस्थित नव्हते. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एमईआरसीला बिलमाफीसंदर्भात काय करावे यासंदर्भात विचारणा केली होती. त्यांनी सांगितल्याप्रमाणेच बिलमाफीबाबत मी बोललो. ते माझे व्यक्तिगत मत नव्हते, असे राऊत यांनी स्पष्ट केले.

प्रसारमाध्यमांशी बोलताना राऊत यांनी ही भूमिका मांडली. अशोक चव्हाण आमचे नेते आहेत व ते कोणतेही वक्तव्य करतात त्याला अर्थ असतो. वीजबिलमाफीसंदर्भात पहिली बैठक अजित पवार यांनी घेतली. त्यावेळी अशोक चव्हाण कोविड उपराचाराकरता रुग्णालयात होते. त्या बैठकीत चर्चा झाली होती व बहुतेक त्याची माहिती चव्हाण यांना नव्हती. एमईआरसीला अजित पवार यांनी फोन लावून विचारणा केली. बिल माफ करण्यासाठी काय करावे याबाबत चर्चा केली. त्यानंतर प्रस्ताव आमच्याकडे पाठवला व कॅबिनेटसमोर मांडायला सांगितले. त्यांनी सांगितल्याप्रमाणेच मी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली, असे नितीन राऊत यांनी सांगितले.

वित्त विभागाच्या उपमुख्यमंत्र्यांनी चार बैठका घेतल्या. वेगवेगळे प्रस्ताव मागण्यात आले. खुद्द मुख्यमंत्र्यांनी तीन वेळा बैठका घेतल्या व आठ वेळा कॅबिनेट नोटदेखील बनविण्यात आल्या, अशी माहितीदेखील राऊत यांनी दिली.