शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
4
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
5
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
6
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
7
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
8
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
9
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
10
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
11
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
12
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
13
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
14
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
15
Mumbai Local: दुहेरी ब्लॉकने मुंबईकर त्रस्त; नोकरदारांना सलग दुसऱ्या दिवशी ‘लेटमार्क’चा फटका 
16
गुरुपुष्यामृत योग २०२६: नशीब पालटणारा सुवर्ण मुहूर्त! २३ एप्रिल, गुरुपुष्यामृत योग 'या' राशींसाठी ठरणार खास!
17
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
18
CSMT: सीएसएमटीवर मोठा अनर्थ टळला! चुकीच्या सिग्नलमुळे दोन लोकल एकाच ट्रॅकवर; नेमकं काय घडलं?
19
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
20
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

गरिबांच्या जीवनात स्थिरता आणणारे संशोधन हवे

By admin | Updated: April 2, 2017 02:51 IST

विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन जीवनापासूनच संशोधनावर भर दिला पाहिजे.

नितीन गडकरी : रामदेवबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘हॅकाथॉन’ स्पर्धेला प्रारंभ नागपूर : विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन जीवनापासूनच संशोधनावर भर दिला पाहिजे. संशोधन करताना ते आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारे व स्वदेशी असले पाहिजे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे संशोधन हे गरीब व वंचितांच्या जीवनात स्थिरता आणणारे हवे, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणीमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे आयोजित ‘हॅकाथॉन’ या विधायक स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते शनिवारी बोलत होते. नागपुरात श्री रामदेवबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात ही स्पर्धा सुरू झाली असून येथे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्रालयाशी संबंधित विविध समस्यांवर दोन दिवसांत विद्यार्थी ‘हायटेक‘ समाधान शोधणार आहेत. याप्रसंगी राष्ट्रीय महामार्ग व पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे संचालक दिलीप जाजू, अखिल भारतीय तांत्रिक शिक्षण परिषदेचे डॉ. दिलीप मालखेडे उपस्थित होते. संशोधन, नाविन्य, तंत्रज्ञान, उद्यमशीलता यांची विद्यार्थ्यांनी कास धरली पाहिजे. ज्ञानाचा संपत्तीत उपयोग होणे आवश्यक आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयातर्फे देशभरात ७८६ अपघातप्रवण स्थळे शोधण्यात आली असून त्यांच्या सुधारणांसाठी ११ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, असे गडकरी यांनी सांगितले. ‘हॅकाथॉन’ स्पर्धेच्या माध्यमातून समोर आलेल्या सूचनांचा निश्चित विचार केला जाईल, असे आश्वासनदेखील गडकरी यांनी यावेळी दिले. यावेळी महाविद्यालयाचे उपाध्यक्ष चंद्रकांतभाई ठाकर, सरचिटणीस गोविंदलाल अग्रवाल, सचिव राजेंद्र पुरोहित, श्यामसुंदर राठी, संजय अग्रवाल, द्वारकाप्रसाद गुप्ता, प्राचार्य डॉ.राजेश पांडे हे प्रामुख्याने उपस्थित होते. प्रतिश्रुती सिंह-अग्रवाल यांनी संचालन केले. नागपुरात १६ राज्यातील ८४ चमू आल्या असून यात एकूण ६८० विद्यार्थी व मार्गदर्शकांचा समावेश आहे. ही स्पर्धा सलग ३६ तास चालणार असून २ एप्रिल रोजी रात्री ८.३० वाजेपर्यंत विद्यार्थी ‘प्रोग्रॅमिंग’ करणार आहेत.(प्रतिनिधी)