शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
2
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
3
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
4
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
5
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
6
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
7
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
8
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
9
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
10
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
11
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
13
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
14
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
15
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
16
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
17
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
18
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
19
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
20
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

By आनंद डेकाटे | Updated: June 29, 2025 19:06 IST

पाकिस्तानचे पुन्हा तुकडे करण्याची संधी देशाने गमावली

नागपूर : पाकिस्तान हा दहशतवादी देश आहे. जेव्हा इंदिरा गांधी यांना संधी मिळाली तेव्हा त्यांनी कशाचीही तमा न बाळगता पाकिस्तानचे दाेन तुकडे केले. तशीच संधी पुन्हा चालून आली होती. देशाचेे सैन्य लढाई जिंकण्याच्या जवळ आले होते. परंतु नरेंद्र मोदी यांच्यासारख्या नाकर्त्या पंतप्रधानांमुळे आपण जिंकलेली लढाई हरलो. ट्रम्पने युध्दबंदी घोषीत करावी एवढी पत विश्वगुरूमुळे भारताची जगात घसरली' अशी जहीर टीका वंचित बहुजन आघाडी नेते माजी खासदार ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी येथे केला. संघाची कुबडी घेऊन राजकारण करणाऱ्या मोदींना ट्रम्पची दादागिरी मोडता आली नाही, असा हल्लाबोलही त्यांनी केला.

रविवारी फुले-आंबेडकर इंटेलेक्चुअल फोरमच्यावतीने कस्तुरचंद पार्क जवळील परवाना भवन येथे ऑपरेशन सिंदूर आणि त्यानंतरची परिस्थिती या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. यावेळी ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ऑपरेशन सिंदूरची पोलखोल करीत भारताची जगात झालेली नाचक्की, पाकिस्तानची कायमची जिरविण्याची संधी आणि विरोधकांची मिळमिळीत भूमिका यावर बोचरी टीका केली.

ॲड. आंबेडकर म्हणाले, ऑपरेशन सिंदूर ही लुटपुटूची लढाई आहे. या युध्दात भारत सपशेल हरला आहे. हल्ला दहशतवादी केंद्रातून नव्हे पाकिस्तानातून होत असतो. गेल्या कित्येक वर्षांपासून ते सुरू आहे. पाकिस्तानचे पाच तुकडे वा नेस्तनाबुत करण्याची मोठी संधी देशाने गमावली. विश्वगुरू जग पालथा घालत आहेत. परंतु, एकाही राष्ट्राला आपल्या बाजूने उभे करू शकले नाहीत. प्रास्ताविक डॉ.सर्जनादित्य मनोहर यांनी केले. संचालन प्रा.डॉ. राजेंद्र डोंगरे यंनी केले. प्रा. अनिकेत मून यांनी आभार मानले.

- भाजप-संघाचे राजकारण देशासाठी घातकसंघाचे बोधचिन्ह स्वास्तिक आहे. ते हिटलरला मानतात. दुसरीकडे इस्त्रायलवर अवलंबून आहेत. अर्थात ज्यूंवर अवलंबून आहे. हिटलर व ज्यू यांचा '३६' चा आकडा आहे. संघ याच आकड्याशी खेळत आहे. असे अतात्वीक राजकारण देशासाठी घातक असल्याचे आंबेडकर म्हणाले.

- फुले शाहू आंबेडकर चळवळीला नेतृत्वाची संधीपाकिस्तानची निमींती असो वा देशातील इतरही प्रश्न, यावर कॉंग्रेस, संघ, माकप काहीही बोलणार नाही. त्यांचा नाइलाज आहे. त्यामुळे फुले शाहू आंबेडकरी चळवळीला नेतृत्व करण्याची संधी आहे. त्यामुळे मौनीवृत्ती सोडा सरकारला थेट प्रश्न विचारा, असे आवाहनही ॲड. आंबेडकर यांनी यावेळी केले.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरNarendra Modiनरेंद्र मोदीPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाOperation Sindoorऑपरेशन सिंदूर