शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

'आमचं कुठलंच भांडण नाही, प्रतिभा धानोरकर यांचा गैरसमज झाला'; विजय वडेट्टीवार यांनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 14:03 IST

चंद्रपूर महापालिकेतील गटनेता निवडीवरून काँग्रेसमधील अंतर्गत वाद उफाळून आला असून आमदार विजय वडेट्टीवार आणि चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यातील संघर्ष चांगलाच टोकाला पोहोचल्याचे दिसत आहे.

चंद्रपूर महापालिकेतील गटनेता निवडीवरून काँग्रेसमधील अंतर्गत वाद उफाळून आला असून आमदार विजय वडेट्टीवार आणि चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यातील संघर्ष चांगलाच टोकाला पोहोचल्याचे दिसत आहे. गटनेता निवडीच्या प्रक्रियेतून हा वाद उफाळून आला असून यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान, आता या वादावर काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांनी प्रतिक्रिया दिली. 'आमच्यात कोणताही वैयक्तिक किंवा राजकीय भांडण नाही, खासदार प्रतिभा धानोरकर यांचा गैरसमज झाल्यामुळेच ही वक्तव्ये झाली असल्याचे वड्डेटीवार म्हणाले.

काँग्रेसमधील अंतर्गत वाद उघड! विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यात नेता निवडीवरुन वाद; प्रदेशाध्यक्ष घेणार बैठक

 "संयमाने आणि एकत्रितपणे काम केल्यास हा वाद नक्कीच सुटेल, असा विश्वासही वड्डेटीवार यांनी व्यक्त केला. गेल्या २५ वर्षांपासून आपण चंद्रपूर जिल्ह्याची जबाबदारी सांभाळत असून, प्रतिभा धानोरकर या अवघ्या सहा वर्षांपूर्वी पक्षात आल्या आहेत. ज्यांनी दशकानुदशके पक्षासाठी मेहनत घेतली, ज्यांच्यावर पक्ष उभा आहे, अशा जुन्या कार्यकर्त्यांना बाजूला सारून पक्ष पुढे जाणार का, हा खरा प्रश्न आहे. नगरपरिषद निवडणुकीत कार्यकर्त्यांनी जीव ओतून काम केले, मात्र त्या निवडणुकीत खासदारांचा सहभाग अत्यल्प होता, असंही वडेट्टीवार म्हणाले.

विजय वडेट्टीवार म्हणाले की,  महानगरपालिका निवडणुकीत दोघांनी मिळून एबी फॉर्मवर सह्या केल्या आणि सुमारे ६० जागांवर सहमतीने उमेदवारी ठरली होती. मात्र वसंत पुरके यांनी सहा जागांवर उमेदवारी कापण्यासाठी आग्रह धरला आणि त्यातून पक्षाचे नुकसान झाले, असे वडेट्टीवार यांनी सांगितले. त्या सहापैकी केवळ दोनच उमेदवार निवडून आल्याचेही ते म्हणाले.

नगरसेवक फोडल्याच्या आरोपांवर उत्तर देताना वडेट्टीवार म्हणाले, कुठल्याही नगरसेवकाला जबरदस्तीने बोलावण्यात आलेले नाही. काही नगरसेवक स्वतःहून माझ्याकडे आले. हायकमांड आली की प्रत्यक्ष नगरसेवकांना विचारावे, सगळे स्पष्ट होईल. खासदार म्हणजे पक्षाचे मालक नसतात. नेते आणि खासदार दोघांचेही काम संयमाने करावे लागते, असंही ते म्हणाले.

मला अनेक प्रलोभने देण्यात आली

पक्ष सोडण्याच्या चर्चांवर बोलताना वडेट्टीवार म्हणाले, मला अनेक प्रलोभने देण्यात आली, पण मी काँग्रेसशी प्रामाणिक आहे. ‘मी कधीही भाजपमध्ये जाणार नाही’ ही माझी ठाम भूमिका आहे. कार्यकर्ता जिथे आहे तिथेच राहतो, तोच पक्षाचा खरा आत्मा असतो, असे त्यांनी स्पष्ट केले.

आज या संदर्भात बैठक होणार असून, प्रदेशाध्यक्ष उपस्थित राहणार आहेत. काँग्रेस एकत्र राहील आणि लवकरच तोडगा निघेल, असा विश्वास विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : No quarrel, Dhanorkar misunderstood: Vijay Wadettiwar clarifies Congress dispute.

Web Summary : Vijay Wadettiwar addressed Congress tensions with Pratibha Dhanorkar over leader selection, dismissing claims of a personal feud. He emphasized his loyalty to Congress, denying BJP switch rumors, and expressed confidence in resolving the misunderstanding through party discussions.
टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारcongressकाँग्रेसChandrapur Municipal Corporation Electionचंद्रपूर महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६