गोदावरी-वैनगंगेच्या खोऱ्यातून पाणी पोहोचणार तापी-पूर्णाच्या खोऱ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:52 IST2021-02-05T04:52:39+5:302021-02-05T04:52:39+5:30

चार प्रकल्प जुळणार वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या या आंतरराज्यीय नदीजोड प्रकल्पात पूर्व आणि पश्चिम विदर्भातील चार प्रकल्प एकमेकांशी जोडले जाणार आहेत. ...

Water will reach Tapi-Purna valley from Godavari-Waingange valley | गोदावरी-वैनगंगेच्या खोऱ्यातून पाणी पोहोचणार तापी-पूर्णाच्या खोऱ्यात

गोदावरी-वैनगंगेच्या खोऱ्यातून पाणी पोहोचणार तापी-पूर्णाच्या खोऱ्यात

चार प्रकल्प जुळणार वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या या आंतरराज्यीय नदीजोड प्रकल्पात पूर्व आणि पश्चिम विदर्भातील चार प्रकल्प एकमेकांशी जोडले जाणार आहेत. पूर्व विदर्भातील गोसेखुर्द प्रकल्पातून (पवनी, जि. भंडारा) पाणी उचलून ते पश्चिम विदर्भातील नळगंगा प्रकल्पात पोहचविण्याची योजना असली तरी या ४२६.५४२ किलोमीटर लांबीच्या प्रवासात वर्धा जिल्ह्यातील निम्न वर्धा प्रकल्प (आर्वी), अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा प्रकल्प (बार्शी-टाकळी) आणि पुढे बुलढाणा जिल्ह्यातील नळगंगा (मोताळा) प्रकल्पात पाणी पोहोचणार आहे. या मार्गामध्ये येणाऱ्या सहा जिल्ह्यांतील १५ तालुक्यांमध्ये ३५ तलाव खोदले जाणार असून, चार तलावांची क्षमता वाढविली जाणार आहे. हे पाणी या ३९ तलावांमध्ये खेळविले जाणार आहे. त्यातून १६,९४० हेक्टर शेतीला सिंचनाचा लाभ होणार आहे तर सिंचन क्षमता वाढविली जाणाऱ्या तलावांतून २,८७८ हेक्टर कृषिक्षेत्राला लाभ मिळणे प्रस्तावित आहे.

....

..असा होईल पाण्याचा प्रवास

गोसेखुर्द ते लोअर वर्धा - १६७.०९ किमी

लोअर वर्धा ते काटेपूर्णा - १३०.६० किमी

काटेपूर्णा ते नळगंगा - १२७.०२ किमी

...

प्रस्तावित साठवण तलाव

नागपूर जिल्हा

कुही तालुका : सातारा, पांडेगाव सावरगाव, खुर्सापार, खलसाना,

उमरेड तालुका : सायकी, मकरधोडा, पांढरबोडी, ठाणा, खैरगाव-कारगाव

हिंगणा तालुका : वडगाव, भान्सुली

नागपूर तालुका : मांगली

वर्धा जिल्हा

सेलू तालुका : सेलडोह, जुवाडी खैरी, बोरखेडी कलान, तामसवाडा

आर्वी तालुका : सुखळी, मालतपूर, खुर्झाडी, वायफड, दहीगाव

वर्धा तालुका : रोता १, रोता २

यवतमाळ जिल्हा

बाभूळगाव तालुका : बेंबळा

नेर तालुका : खंडाळा

अमरावती जिल्हा

धामनगाव तालुका : वडगाव दिपोरी,

नांदगाव खं. तालुका : येरंडगाव, नांदगाव, शेलगुंड, टाकळी कन्नाड, पापळ-१, खरबी

अकोला जिल्हा

बार्शी टाकळी तालुका : लोअर काटेपूर्णा, येलवन

अकोला तालुका : सीसा उडेगाव, चिखलगाव

बुलढाणा जिल्हा

शेगाव तालुका : कोलारी, शेलोडी

...

Web Title: Water will reach Tapi-Purna valley from Godavari-Waingange valley

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.