शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
3
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
4
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
5
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
6
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
7
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
8
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
9
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
10
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
11
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
12
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
13
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
14
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
15
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
16
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
17
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
18
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
19
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
20
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण

नागपूरकरांना उद्या पाणीपुरवठा राहणार बंद; दहा जलकुंभांवरून पाणीपुरवठा होणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 15:38 IST

पेंच-४ एक्स्प्रेस फीडरवर २० तासांचे शटडाऊन : टँकरही राहणार बंद

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पेंच-४ एक्स्प्रेस फीडरवर १० डिसेंबरला २० तासांचे शटडाऊन घेण्यात आले आहे. त्यामुळे शहरातील १० जलकुंभांवरून मंगळवारी पाणीपुरवठा होणार नाही. शटडाऊन १० डिसेंबरला सकाळी १० वाजता सुरू होऊन ११ डिसेंबरला सकाळी ६ वाजेपर्यंत चालणार आहे. 

शटडाऊन करण्यात आलेल्या कालावधीत ६०० मिलीमीटर व्यासाच्या हुडकेश्वर व नरसाळा टॅपिंगजवळ कंटेनर यार्डमध्ये फ्लो मीटर लावण्यात येईल. यामुळे संबंधित लाइनशी निगडित पाण्याच्या टाक्यांवरून पाणीपुरवठा होणार नाही. सोबतच शटडाऊनच्या कालावधीत टँकरद्वारेही पाणीपुरवठा करण्यात येणार नसल्याचे महापालिकेच्या जलप्रदाय विभाग आणि पाणीपुरवठा करणाऱ्या ओसीडब्ल्यू कंपनीच्या वतीने कळविण्यात आले आहे.

या भागात होणार नाही पाणीपुरवठा

ओंकारनगर पाण्याची टाकी (सध्याची) : गजानननगर, जयवंतनगर, साईनगर, स्वराजनगर, बिनकर कॉलनी, गुरुदेवनगर, इंद्रप्रस्थ सोसायटी, मानेवाडा जुनी वस्ती, दिवाण लेआऊट, कपिलनगर, वनराईनगर, जबलपूर लेआउट, श्रीहरिनगर १, २, ३, ओंकारनगर, स‌द्भावनानगर. 

ओंकारनगर पाण्याची टाकी (प्रस्तावित) : ग्रीन प्लॅनेट कॉलनी, अंबा शिवशक्तीनगर, मंगलदीपनगर १ व २. गुरुदेवनगर, कल्याणेश्वरनगर, गीतानगर, शाहूनगर, कल्पतरूनगर, चंडिकानगर १ व २, चिंतामणीनगर, डायमंड सोसायटी, विराज सोसायटी, नरहरीनगर, आकाशनगर, अवधूतनगर १ व २, शेषनगर, शेवाळे लेआऊट, अजितनाथ सोसायटी, अलंकारनगर, डोबीनगर, संधेरकर लेआऊट, मुद्रानगर, राधानंदनगर, श्रीकृष्णनगर, आराधनानगर १ व २, अभिजितनगर १ व २, दौलतनगर. 

जोगीनगर (अमृत) पाण्याची टाकी) : जोगीनगर, काशीनगर, अभयनगर, महात्मा फुले कॉलनी, वैष्णव सोसायटी, रामटेकेनगर, रहाटेनगर, राजश्रीनगर, जयवंत सोसायटी, रमानगर, ८५ प्लॉट एरिया, रेणुका विहार, धाडीवाल लेआऊट, फुलमती लेआऊट, एकतानगर, 

हुडकेश्वर पाण्याची टाकी : अमरनगर, न्यू अमरनगर, गुरुकुंजनगर, महाकालीनगर, सरस्वतीनगर, जानकीनगर, विज्ञाननगर, संजय गांधीनगर, न्यू नेहरूनगर, भोले बाबानगर, संत केसरमाता नगर, संतोषीनगर, विठ्ठलनगर १ व २, कार्पोरेशन कॉलनी, धनगवळीनगर, म्हाळगीनगर (जुने व नवे), महात्मा गांधीनगर, गजानननगर, सूर्योदयनगर, महालक्ष्मीनगर, प्रेरणानगर (जुने व नवे), विनायकनगर, अन्नपूर्णानगर, 

नालंदानगर पाण्याची टाकी : चंद्रनगर, भगवाननगर, बँक कॉलनी, बालाजीनगर, उल्हासनगर, नाईकनगर, मित्रनगर, कैलासनगर (जुने व नवे) ज्ञानेश्वरनगर, पार्वतीनगर, जयभीमनगर, बाबुलखेडा, बॅनर्जी लेआऊट, महात्मा फुले कॉलनी. 

श्रीनगर पाण्याची टाकी : शिल्पा सोसायटी, नगरविकास सोसायटी, नवनाथ सोसायटी, श्रीनगर, नरेंद्रनगर, भीमनगर, जोगीनगर, युनिक सोसायटी, पार्वतीनगर, जय दुर्गा सोसायटी, अरविंद सोसायटी, उज्ज्वल सोसायटी, सुंदरवन लेआऊट, रानवाडी, बोरकुटे लेआऊट, सुयोगनगर, साकेतनगर, धाडीवाल लेआऊट, हावरापेठ, द्वारकापुरी, रामेश्वरी, मस्के लेआऊट, गुरुदत्ता सोसायटी, चिरंजिवीनगर, पीएमजी लेआऊट, बालपांडे लेआऊट, संताजी सोसायटी, साईकृपा सोसायटी. 

सक्करदरा १ व २ पाण्याची टाकी: गवंडीपुरा, सेवादलनगर, राणी भोसलेनगर, गोंडपुरा, दत्तात्रयनगर, सुर्वे लेआऊट, बँक कॉलनी, जवाहरनगर, चक्रधरनगर, इस्ट बालाजीनगर, दुर्गानगर, लाडेकर लेआऊट, श्रीनगर, लवकुशनगर, उदयनगर, अयोध्यानगर, आदिवासी लेआऊट, सच्चिदानंदनगर, जुना सुभेदार लेआऊट. 

सक्करदरा ३ : न्यू सुभेदार लेआऊट, गुरुदेवनगर, रुक्मिणीनगर, श्रीरामनगर, संजय गांधीनगर, आशीर्वादनगर, महावितरण कॉलनी, द्वारकानगर, राजीव गांधीनगर, न्यू बिडीपेठ, जुनी बिडीपेठ, इंदिरा गांधीनगर, सरताज कॉलनी, ताज अम्मा कॉलनी, ठाकूर प्लॉट, टीचर्स कॉलनी, यासीन प्लॉट, तौहिदनगर. 

हुडकेश्वर व नरसाळा टॅपिंग : चंद्रभागा ईएसआर, संभाजीनगर ईएसआर, भारतमाता ईएसआर, ताजेश्वरनगर ईएसआर.

टॅग्स :water transportजलवाहतूकwater shortageपाणीकपातwater scarcityपाणी टंचाईnagpurनागपूर