शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वादळामुळे नागपूर शहरातील पाणीपुरवठा प्रभावित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 23:22 IST

नवेगाव खैरी डॅम परिक्षेत्रात शुक्रवारी आलेल्या वादळी पावसामुळे शहरातील पाणीपुरवठा संकटात सापडला आहे. दुपारी ३ वाजता वादळामुळे नवेगाव खैरी येथील वीज पुरवठा खंडित झाला. त्यानंतर एका तासानंतर कन्हान पंपिंग स्टेशनमधील वीज गेली. कन्हानमधील वीज तासाभरात परत आली. परंतु तेव्हापर्यंत शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था पूर्णपणे प्रभावित झाली होती. नवेगाव खैरीमध्ये वीज गेल्याने सर्वाधिक परिणाम पडला.

ठळक मुद्देनवेगाव खैरी येथील वीज पुरवठा खंडितधरमपेठ, लक्ष्मीनगर, धंतोली व गांधीनगर झोनसह बोरियापुऱ्यावर पडणार प्रभाव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नवेगाव खैरी डॅम परिक्षेत्रात शुक्रवारी आलेल्या वादळी पावसामुळे शहरातील पाणीपुरवठा संकटात सापडला आहे. दुपारी ३ वाजता वादळामुळे नवेगाव खैरी येथील वीज पुरवठा खंडित झाला. त्यानंतर एका तासानंतर कन्हान पंपिंग स्टेशनमधील वीज गेली. कन्हानमधील वीज तासाभरात परत आली. परंतु तेव्हापर्यंत शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था पूर्णपणे प्रभावित झाली होती. नवेगाव खैरीमध्ये वीज गेल्याने सर्वाधिक परिणाम पडला.नवेगाव खैरी येथे ब्रेकडाऊनमुळे लक्ष्मीनगर, धरमपेठ, धंतोली, गांधीनगर झोनमध्ये येणाऱ्या जलकुंभांसह बोरियापुरा फीडरमधून रविवारपर्यंत पाणीपुरवठा प्रभावित राहण्याची शक्यता आहे. यादरम्यान शहरातील बहुतांश भागात पाणीपुरवठा होणार नाही.एकीकडे तोतलाडोह धरणामधील डेड स्टॉक पाणीही हळूहळू संपत आले आहे. त्यावर वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने शहरात अचानक जलसंकट निर्माण झाले आहे. ओसीडब्ल्यूतर्फे सांगण्यात आले आहे की, नवेगाव खैरी येथे झालेल्या ब्रेकडाऊनमुळे दुपारी ३ वाजता कच्च्या पाण्याचे पंपिंग अचानक थांबले. परिणामी सायंकाळी ५ वाजेपर्यंत पाणी उचलता येऊ शकले नाही. यामुळे पेंच-१, पेंच-२, पेंच-३ दुपारी ४.३० वाजेपर्यंत पूर्णपणे ठप्प झाले होते. पाण्याच्या टाक्या खाली झाल्या होत्या. नळ तर सोडाच टँकरनेही पाणीपुरवठा होऊ शकला नाही.पाणी पुरवठा विभागातर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार ब्रेकडाऊनमुळे शनिवारी व रविवारी अनेक भागात पाणीपुरवठा होणार नाही. तर शहरातील काही भागात सीमित पाणीपुरवठा केला जाईल. गोरेवाडा तलावाची पातळीसुद्धा ३११.८० मीटरवर आली आहे. ती पाणीपुरवठा व्यवस्थेसाठी बिलकूल योग्य नाही. येथून पाणीसुद्धा उचलले जाऊ शकत नाही.सलग सहा दिवसांपासून वीज पुरवठा खंडितनवेगाव खैरीमध्ये वादळामुळे सलग सहा दिवसांपासून ब्रेकडाऊन होत आहे. नंतर महावितरणतर्फे वीज उपलब्ध करून दिली जात आहे. परंतु पंपिंग एक तासही बंद राहिले तर त्याचा परिणाम दिवसभर राहतो. २ जून रोजी रात्री ४ तास, ५ जून रोजी सकाळी व ६ जून रोजी एक तासासाठी वीज पुरवठा खंडित झाला होता. ७ जून रोजी दुपारी झालेल्या ब्रेकडाऊनमुळे पाणीपुरवठा यंत्रणा पूर्णपणे विस्कळीत झाली आहे.दुसऱ्या लाईनवरून वीज पुरवठाशहरातील पाणीपुरवठा प्रभावित होत असल्याची माहिती मिळताच महावितरणने तात्काळ उपाययोजना सुरू केली. सावनेर येथील कार्यकारी अभियंता कुलदीप भस्मे यांच्यानुसार पाऊस व वादळामुळे वीज वितरण यंत्रणा मोठ्या प्रमाणावर क्षतिग्रस्त आहे. तरीही पाणीपुरवठा प्रभावित होऊ नये म्हणून लगेच दुसऱ्या लाईनवरून वीज उपलब्ध करण्यात आली. उर्वरित ठिकाणी वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू आहेत. पारशिवनीचे उपकार्यकारी अभियंता राजेश मछले आपल्या चमूसह प्रयत्न करीत आहेत.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाWaterपाणीelectricityवीज