२५ जलकुंभावरील पाणीपुरवठा २४ तास बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:10 IST2021-08-22T04:10:24+5:302021-08-22T04:10:24+5:30
मंगळवारी सकाळी ८ ते बुधवारी सकाळी ८ पर्यंत शटडाऊन लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महापालिका व ऑरेंज सिटी वॉटर ...

२५ जलकुंभावरील पाणीपुरवठा २४ तास बंद
मंगळवारी सकाळी ८ ते बुधवारी सकाळी ८ पर्यंत शटडाऊन
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी गोरेवाडास्थित पेंच-२ आणि पेंच-३ जलशुद्धीकरण केंद्र येथून निघणाऱ्या मुख्य जलवाहिनीवर फ्लोमीटर लावणे तसेच अंतर्गत दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. २४ तासाच्या शटडाऊनमुळे मंगळवारी सकाळी ८ ते बुधवारी सकाळी ८ पर्यंत सहा झोनमधील २५ जलकुंभांचा पाणीपुरवठा बंद राहील. शटडाऊन काळात पेंच- ३ च्या आऊटलेटवर व्हॉल्व्ह लावण्याचे काम करण्यात येईल.
...
पाणीपुरवठा बंद राहणारे जलकुंभ
लक्ष्मीनगर झोन - लक्ष्मीनगर जलकुंभ, गायत्रीनगर जलकुंभ, प्रतापनगर जलकुंभ, खामला जलकुंभ, टाकळी सीम जलकुंभ आणि जयताळा, त्रिमूर्तीनगर जलकुंभ.
गांधीबाग झोन - सीताबर्डी फोर्ट जलकुंभ, बोरियापुरा, खदान व किल्ला महाल जलकुंभ.
धरमपेठ झोन - रामनगर जलकुंभ, रामनगर जलकुंभ-२ रायफल लाईन, फुटाळा लाईन, सेमिनरी हिल्स जलकुंभ, सेमिनरी हिल्स जुने जलकुंभ, दाभा जलकुंभ, टेकडी वाडी जलकुंभ, फुटाळा लाईन, सिव्हिल लाईन, कइट लाईन.
हनुमाननगर झोन - चिंचभुवन जलकुंभ
सतरंजीपुरा झोन - बोरियापुरा जलकुंभ
मंगळवारी झोन - गिट्टीखदान जलकुंभ