शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा रोषामुळे बीड मतदारसंघात सभा टाळली?; फडणवीसांनी दिलं रोखठोक उत्तर
2
T20 World Cup मध्ये भारताची डोकेदुखी वाढवणारी बातमी! ICC च्या नियमामुळे गोंधळ 
3
स्वाती मालिवाल यांच्यासोबत गैरवर्तन झालं, AAP ने दिली कबुली, दोषींवर केजरीवाल करणार कठोर कारवाई
4
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
5
सत्ताधाऱ्यांकडून राज्यात २ हजार कोटींचे वाटप; आमदार रोहित पवारांचा गंभीर आरोप
6
लवंगाचे पाणी आरोग्यासाठी रामबाण, मिळतील आश्चर्यकारक फायदे!
7
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
8
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."
9
Narendra Modi : "केरळने धडा शिकवला, उत्तर प्रदेशच्या जनतेनेही ओळखलंय"; मोदींचा राहुल गांधींना खोचक टोला
10
अमेठी, रायबरेलीत काँग्रेसच्या हाताला सपाच्या सायकलची साथ, अखिलेश यादव यांचे कार्यकर्त्यांना स्पष्ट आदेश 
11
सैन्यातील नोकरी सोडून गाझातल्या लोकांच्या मदतीसाठी धावले; इस्रायलच्या हल्ल्यात वैभव काळेंचा मृत्यू
12
Akhilesh Yadav : "भाजपाने Google वर 100 कोटींचा प्रचार करण्याचा रेकॉर्ड केला... हा जनतेचा पैसा"
13
ॐ मित्राय नमः! सूर्यनमस्काराचे १० जबरदस्त फायदे; इतका परिपूर्ण व्यायाम की जिमची गरजही नाही
14
कार्तिकी गायकवाडच्या घरी 'लिटील चॅम्प'चं आगमन; पोस्ट शेअर करत दिली गुडन्यूज
15
तुम्ही काय दिवे लावले? हार्दिकवर टीका करणाऱ्या AB de Villiers वर गौतम गंभीर खवळला 
16
"बायको गेल्यानंतर स्वत:ला संपवायचं ठरवलं होतं", कठीण काळाबद्दल बोलताना भूषण कडू भावुक
17
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; अदानी एन्टरप्राईजेसमध्ये तेजी, Cipla घसरला
18
जगातील सर्वात पॉवरफुल क्रॉसओवर बाईक BMW M 1000 XR लाँच,  जाणून घ्या किंमत...
19
RCB vs CSK सामन्यावर पावसाचं सावट! सामना रद्द झाल्यास प्ले ऑफमध्ये कोण जाणार?
20
घाटकोपरसारखीच चूक २१ वेळा; होर्डिंग दुर्घटनेला जबाबदार असलेला भावेश भिंडे कोण आहे?

१० जूनपर्यंत पुरेल एवढाच पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 10:02 PM

कमी पावसामुळे तोतलाडोह व पेंच नवेगांव खैरी या दोन्ही प्रकल्पामध्ये ६७.४४२ दलघमी इतका पाणीसाठा उपलब्ध असून पिण्याच्या पाण्यासह दररोज १.३० दलघमी पाणी वापर असल्यामुळे १० जूनपर्यंत पुरेल एवढेच पाणी या प्रकल्पात उपलब्ध आहे. पाणीसाठ्याची एकूण परिस्थिती लक्षात घेता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पाणी आरक्षण तसेच तोतलाडोह व पेंच नवेगांव खैरी प्रकल्पातील असलेल्या पाण्याचा आढावा जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी घेतला. त्याप्रसंगी पिण्याचे पाणी काटकसरीने वापरण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्यात.

ठळक मुद्देपाणी आरक्षणासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कमी पावसामुळे तोतलाडोह व पेंच नवेगांव खैरी या दोन्ही प्रकल्पामध्ये ६७.४४२ दलघमी इतका पाणीसाठा उपलब्ध असून पिण्याच्या पाण्यासह दररोज १.३० दलघमी पाणी वापर असल्यामुळे १० जूनपर्यंत पुरेल एवढेच पाणी या प्रकल्पात उपलब्ध आहे. पाणीसाठ्याची एकूण परिस्थिती लक्षात घेता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पाणी आरक्षण तसेच तोतलाडोह व पेंच नवेगांव खैरी प्रकल्पातील असलेल्या पाण्याचा आढावा जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी घेतला. त्याप्रसंगी पिण्याचे पाणी काटकसरीने वापरण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्यात.यावेळी जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता बी. एच. स्वामी, महाजेनको कोराडीचे मुख्य अभियंता अभय हरणे, खापरखेडा विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता राजेश पाटील, महसूल उपजिल्हाधिकारी सुजाता गंधे, महापालिकेचे सहाय्यक आयुक्त राम जोशी, पेंच पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता जे. बी. तुरखेडे, कार्यकारी अभियंता बॅनर्जी, कळमेश्वरचे मुख्याधिकारी एच. डी. साखरखेडे आदी उपस्थित होते.तोतलाडोह व पेंच नवेगांव खैरी प्रकल्पामध्ये सन २०१७-१८ या वर्षात कमी पावसामुळे अत्यल्प पाणीसाठा असल्यामुळे उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करुन पिण्याचे पाणी जास्तीत जास्त उपलब्ध होईल यादृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना करताना जिल्हाधिकारी अश्विन मुदगल म्हणाले की, सद्यस्थितीत असलेल्या पाणी वापरानुसार २७.५० दलघमी पाण्याची तूट राहणार आहे. त्यामुळे संभाव्य पिण्याच्या पाण्याच्या टंचाईवर मात करण्यासाठी उपाययोजना तात्काळ लागू कराव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिल्यात.कळमेश्वरला कोच्छी प्रकल्पातून पाणीनवेगांव खैरी प्रकल्पातील पिण्याचे पाणी मातीच्या बांधामुळे काढण्यास अडचण निर्माण होत असल्यामुळे जलाशयात फ्लोटिंग पंपाच्या माध्यमातून पाणी उपसा करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्यात. कळमेश्वर शहरातील पाणीपुरवठा पेंच उजव्या कालव्यातून करण्यात येत आहे. ३८ किलोमीटर कालव्यातून पाणी येत असल्यामुळे पाण्याचा अपव्यय मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे बंद नलिकेद्वारे पाणी उचलणे अथवा कोच्छी प्रकल्पातून पाणी उचलण्याच्या प्रस्तावाला गती देण्यात येऊन येत्या तीन महिन्यात ही योजना कार्यान्वित होईल यादृष्टीने नियोजन करावे, अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या.विद्युत केंद्रांना पुनर्प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुरवठाऔष्णिक विद्युत केंद्रांना शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करुन त्याचा वापर मोठ्या प्रमाणात करणे बंधनकारक आहे. नागपूर महानगरपालिकेतर्फे ४७ दलघमी पाणी वीज निर्मितीकरिता पुरविण्यात येत आहे. त्यामुळे विद्युत प्रकल्पासाठी पाण्याचे प्रकल्पीय आरक्षण करताना पुनर्वापर केलेल्या पाण्याला प्राधान्य देण्यात यावे, असे जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी सांगितले.पाणी काटकसरीने वापराउन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचा काटकसरीने वापर करुन शुद्ध पिण्याच्या पाण्याचा इतर कामासाठी कुठेही वापर होणार नाही. यादृष्टीने महानगरपालिकेतर्फे तात्काळ उपाययोजना कराव्यात. नागरिकांनीही पाणी काटकसरीने वापरावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी केले आहे. उन्हाळ्यात कुलरसह इतर वापरासाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात होत असून इतर कामांकरिता केवळ विहिरीच्या अथवा बोअरच्या पाण्याचा वापर नागरिकांनी करावा यासाठी जनजागृती मोहीम शहराच्या विविध भागात राबवावी. तसेच टिल्लू पंपद्वारे पाणी घेणाऱ्या नागरिकांवर कारवाई करुन त्यांचे टिल्लू पंप जप्त करावेत, असे निर्देश यावेळी देण्यात आले. इतर वापरातील शुद्ध पाण्याची बचत केल्यास १० टक्के पाण्याची बचत होणार आहे.तसेच दुष्काळी परिस्थिती उद्भवल्यास पिण्याच्या पाण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यासंदर्भात जलसंपदा विभागाने प्रस्ताव सादर करावा, असे निर्देशही जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिले.

टॅग्स :Nagpur Collector Officeनागपूर जिल्हाधिकारी कार्यालयwater scarcityपाणी टंचाई