शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
4
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
5
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
6
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
7
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
8
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
9
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
10
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
11
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
12
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
13
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
14
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
15
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
16
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
17
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
18
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
19
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
20
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
Daily Top 2Weekly Top 5

आणखी आठ दिवस जलसंकट

By admin | Updated: March 3, 2015 01:38 IST

नवेगाव खैरी बांधाचा उजवा कालवा फुटल्याने आणि त्याचे काम कासवगतीने

उजव्या कालव्याच्या दुरुस्तीचे काम कासवगतीने नागपूर : नवेगाव खैरी बांधाचा उजवा कालवा फुटल्याने आणि त्याचे काम कासवगतीने सुरू असल्याने शहरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. दुरुस्तीचे काम पाहता पश्चिम, दक्षिण-पश्चिम आणि दक्षिण व मध्य नागपूरचा पाणीपुरवठा १० मार्चपर्यंत बाधित राहणार आहे. गेल्या २५ फेब्रुवारी रोजी नवेगाव खैरी बांधाचा उजवा कालवा हा बांधापासून २३ किलोमीटर अंतरावर फुटला. या कालव्याच्या दुरुस्तीचे काम २७ फेब्रुवारी रोजी पाटबंधारे विभागाने हाती घेतले. त्यात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने दुरुस्तीचे काम ठप्प झाले आहे. आता हे काम कधी पूर्ण होणार व उजव्या कालव्यातून होणारा पाणीपुरवठा कधी पूर्ववत होणार, याबाबत मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. २५ फेब्रुवारी रोजी पडलेली फूट ही गेल्या अनेक वर्षांतील सर्वात मोठी क्षति असून, कालव्याच्या दोन्ही बाजूला सुमारे १०० फूट इतकी या फुटीची लांबी आहे. यानंतर नवेगाव खैरी बांधाचे दरवाजे २५ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता बंद करण्यात आले. यामुळे गोरेवाडा तलावातील पातळी सतत घटत असून, जलशुद्धीकरण केंद्राच्या पंपिंगवर त्याचा परिणाम होण्यास व त्यामुळे शहराला होणाऱ्या शुद्ध पाण्याच्या पुरवठ्यात घट होत आहे. गोरेवाडा जलाशयातून शहराला ६५ टक्के पाणी पुरवले जाते. पाटबंधारे विभागाच्या नवेगाव खैरी बांधाच्या उजव्या कालव्याच्या जर्जर अवस्थेमुळे व वारंवार हा कालवा फुटल्यामुळे तलावातील पाण्याची पातळी पुन्हा ३१५.०८ वरून ३१३.९० मीटर इतकी कमी झाली आहे. जलाशयाच्या पातळीत होणाऱ्या सततची घट यामुळे गोरेवाडा जलशुद्धीकरण केंद्राला व परिणामी पश्चिम, दक्षिण-पश्चिम आणि दक्षिण व मध्य नागपूरला होणारा पाणीपुरवठा १० मार्चपर्यंत बाधित राहण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)मनपा-ओसीडब्ल्यूची दिलगिरी गेल्या वर्षी ३१ आॅक्टोबर रोजी उजवा कालवा निंबा गावाजवळ फुटला होता. त्यानंतर १३ नोव्हेंबर रोजी बाभूळखेडा गावाजवळ पुन्हा एकदा हा कालवा फुटला होता. या सर्व परिस्थितीत ओसीडब्ल्यू व मनपाचे तज्ज्ञ त्यांच्यापरीने नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. गैरसोयीबाबत मनपा ओसीडब्ल्यूतर्फे दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे.