शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
3
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
4
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
5
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
6
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
7
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
8
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
9
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
10
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
11
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
12
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
13
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
14
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
15
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
16
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
17
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
18
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
19
मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांचे १७ नोव्हेंबरपासून आंदोलन
20
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळग्रस्त महाराष्ट्रात रस्त्यांसह मिळू लागले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 22:25 IST

केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी राज्य महामार्गाच्या बांधकामासोबतच परिसरात जलसंधारणाची कामे करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. त्या निर्णयाचे फलित आता दिसू लागले आहे. दुष्काळग्रस्त महाराष्ट्रात महामार्गांसह पाणीही उपलब्ध होऊ लागले आहे.

ठळक मुद्देराज्य महामार्गासह जलसंधारणाची कामे : गडकरींच्या निर्णयाचे फलित

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी राज्य महामार्गाच्या बांधकामासोबतच परिसरात जलसंधारणाची कामे करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. त्या निर्णयाचे फलित आता दिसू लागले आहे. दुष्काळग्रस्त महाराष्ट्रात महामार्गांसहपाणीही उपलब्ध होऊ लागले आहे.महाराष्ट्रातील अनेक भाग आजही दुष्काळग्रस्त आहेत. शेतकरी आत्महत्या होताहेत. या गंभीर समस्येची जाण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही आहे. या समस्येतून मार्ग काढण्यासाठी त्यांनी ‘महामार्गाचे रुंदीकरण करतांना परिसरातील नदी-तलावांचे खोलीकरण करण्याचा एक ऐतिहासिक निर्णय घेतला. राज्य महामार्ग बांधत असताना मोठ्या प्रमाणावर मातीची गरज असते. ही माती बाहेरून बोलावली जाते. त्यावर कोट्यवधी रुपये खर्च येतो. अशा परिस्थितीत रस्ता रुंदीकरण करताना जवळपासच्या नदी-तलावांमधील गाळाचा वापर करण्यास गडकरी यांनी मंजुरी दिली. यातून दोन फायदे होत आहेत. एक तर नदी-तलावातील गाळ काढून या मातीची गरज भागवल्यास रस्ता बांधकामास मदत होते. यामुळे कोट्यवधी रुपयांची बचत होईल आणि नदी तलावांचे खोलीकरण होऊन ते पुनर्जीवित होत आहेत. यातून जलसंधारणाचे कामही होत आहे.महाराष्ट्रातील बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव हा परिसरही शेतकरी आत्महत्याग्रस्त म्हणून ओळखला जातो. गडकरींच्या निर्णयानंतर या परिसरातील नदी, नाले आणि तलावांना पुनर्जीवित करण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. येथील राज्य महामार्गाच्या बांधकामाला मंजुरी मिळालेली आहे. त्यामुळे खामगावमध्ये अनेक सकारात्मक बदलांनी गती पकडली आहे. यापूर्वी या भागात पाणी साठवण्याची क्षमता खूप कमी होती. त्यामुळे भरपूर पाऊस होऊनही नदी, नाले, तलाव आणि बांधांमधील पाणी पुन्हा वाहून जात होते. परंतु यावेळी जलस्रोतांवर बांध बांधल्यामुळे आणि नदी-नाले व तलावातील गाळ काढल्यामुळे वाहून जाणारे पाणी नदी-नाले व तलावांमध्ये थांबले आहे. येथील लोकांचे म्हणणे आहे की, गेल्या ३० वर्षानंतर येथील नदी-नाले व तलावांमध्ये इतके पाणी असल्याचे पाहायला मिळाले आहे.असे बदलले चित्रबुलडाणा जिल्ह्यातील खामगाव विधानसभा क्षेत्रात राष्ट्रीय महामार्ग सुधाराचे चार प्रकल्प प्रगतिपथावर आहेत. या प्रकल्पांसाठी लागणाऱ्या मातीसाठी २७ तलाव आणि १२ नदींमधील गाळ काढण्यात आला आहे. एकूण ३०,७५,००० घनमीटर माती काढण्यात आली. यामुळे या नदी-तलवातील पाणी साठवण्याची क्षमता वाढून ती ३०७५ टीसीएम पर्यंत पोहोचली आहे. यामुळे परिसरातील ५२ गावे आणि ३८ पाणीपुरवठा योजनेलाही याचा लाभ झाला आहे. तसेच आतापर्यंत १५,००० विहिरीसुद्धा पुन्हा पाण्याने भरल्या आहेत. 

टॅग्स :highwayमहामार्गWaterपाणी