न्यूसेन्स डिटेक्शन स्क्वॉडचा शहरावर वॉच

By Admin | Updated: June 13, 2017 02:07 IST2017-06-13T02:07:39+5:302017-06-13T02:07:39+5:30

मोकळ्या जागेवर कचरा फेकणे, परिसरात अस्वच्छता पसरविणे, अतिक्रमण करणे, अनधिकृत होर्डिंग्ज लावणे अशी बेकायदेशीर कृती करणाऱ्यांवर आता न्यूसेन्स डिटेक्शन स्क्वॉडचा वॉच राहणार आहे.

Watch the town of Newcastle Detection Squad | न्यूसेन्स डिटेक्शन स्क्वॉडचा शहरावर वॉच

न्यूसेन्स डिटेक्शन स्क्वॉडचा शहरावर वॉच

अस्वच्छता, अतिक्रमणावर उपाय : नियमानुसार केली जाईल कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मोकळ्या जागेवर कचरा फेकणे, परिसरात अस्वच्छता पसरविणे, अतिक्रमण करणे, अनधिकृत होर्डिंग्ज लावणे अशी बेकायदेशीर कृती करणाऱ्यांवर आता न्यूसेन्स डिटेक्शन स्क्वॉडचा वॉच राहणार आहे. महानगरपालिका प्रत्येक झोनसाठी असे स्क्वॉड तयार करणार असून त्यात एक प्रमुख, चार सहायक व वाहन चालकाचा समावेश राहणार आहे. स्क्वॉड शहरभर फिरून संबंधितांवर कारवाई करेल.
मनपाच्या आरोग्य विभागांतर्गत स्क्वॉड कार्यरत राहील. स्क्वॉडच्या प्रमुखासाठी सेवानिवृत्त सैनिकाला प्राधान्य दिले जाणार असल्याची माहिती आहे.
सर्व १० स्क्वॉडवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष कार्य अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाईल. येत्या २० जून रोजी होणाऱ्या आमसभेत यासंदर्भातील प्रस्ताव मंजुरीसाठी सादर केला जाणार आहे. स्क्वॉडजवळ तत्काळ दंडाची पावती फाडणारे उपकरण राहील.
स्क्वॉडवर दर महिन्यात १७.५५ लाख रुपये खर्च होण्याचा अंदाज आहे. शुल्क वसुलीबाबत वाद निर्माण झाल्यास त्यावर निर्णय घेण्याचा अधिकार सहायक आयुक्तांकडे राहणार आहे.

दंड वाढत जाईल
संस्था, दुकानदार, गॅरेज, मॉल, रुग्णालये, फुटपाथवर व्यवसाय करणारे इत्यादीपैकी कोणी पहिल्यांदा दोषी आढळून आल्यास त्याच्यावर निर्धारित दराने दंड आकारला जाईल. त्यानंतर दुसऱ्यांदा दुप्पट, तिसऱ्यांदा तिप्पट, चौथ्यांदा चौपट, पाचव्यांदा पाचपट असा दंड वाढत जाईल.

प्रस्तावित दंड
प्रकरण दंड
थुंकणे५०
कचरा फेकणे (वैयक्तिक)५०
मल-मूत्र१००
अस्वच्छता पसरविणे (दुकानदार)२००
अस्वच्छता पसरविणे (शिक्षण संस्था)५००
अस्वच्छता पसरविणे (मांस विक्रेते)५००
रोडवर जनावरे बांधणे५००
वाहन/जनावरे धुणे५००
अस्वच्छता पसरविणे (रुग्णालये व लॅब)१०००
अस्वच्छता पसरविणे (मॉल, हॉटेल)१०००
जैविक कचरा फेकणे नियमानुसार.

Web Title: Watch the town of Newcastle Detection Squad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.