शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

Maharashtra Assembly Election 2019 : सोशल मीडिया व पेड न्यूजवर 'वॉच'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 11:08 PM

सर्व राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी प्रचारादरम्यान वापरण्यात येणारे सोशल मीडियासह सर्व प्रकारचे प्रचार साहित्य हे छपाईपूर्वी माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीकडून प्रमाणित करून घ्यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी केल्या.

ठळक मुद्देमाध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समिती स्थापित : प्रचार साहित्य छपाईपूर्वी समितीकडून प्रमाणित करून घ्या

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. सध्या सोशल मीडिया प्रभावी आहे. तेव्हा निवडणुकीदरम्यान सोशल मीडियासह वर्तमानपत्रातील पेड न्यूजवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. तेव्हा जिल्ह्यांतील सर्व राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी प्रचारादरम्यान वापरण्यात येणारे सोशल मीडियासह सर्व प्रकारचे प्रचार साहित्य हे छपाईपूर्वी माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीकडून प्रमाणित करून घ्यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी केल्या.जिल्हाधिकारी कार्यालयात माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समिती (एमसीएमसी) सोमवारी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत फडके, उप जिल्हा निवडणूक अधिकारी राजलक्ष्मी शहा, निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र खजांजी, समिती सदस्य सचिव जिल्हा माहिती अधिकारी (विशेष कार्य) अनिल गडेकर, सदस्य गजानन जानभोर, महेश माखेजा, मोईज हक, आनंद आंबेकर, गौरी मराठे, शैलजा वाघ, अतुल भुसारी, धनंजय वानखडे उपस्थित होते. विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू झाली असून विविध राजकीय पक्ष, उमेदवार यांच्यामार्फत प्रचार साहित्याची छपाई मोठ्या प्रमाणात करून घेण्यात येते. हे प्रचार साहित्य छपाई केलेल्या, छपाई करण्यापूर्वी माध्यम नियंत्रण व प्रमाणीकरण समितीमार्फत प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. तसेच छपाई संदर्भातील मजकूर या समितीमार्फत तपासणी करणे आवश्यक आहे. त्यानंतर प्रचार साहित्याची छपाई करावी व त्याबाबत छपाई करण्यात आलेल्या प्रती याबाबतची माहिती मुद्रणालयाच्या व्यवस्थापकाने जिल्हा नोडल अधिकारी आचारसंहिता कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर तसेच माध्यम नियंत्रण कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय येथील कक्षात सादर करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिल्या.

...तर गुन्हे दाखल होतील  माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीकडून निवडणूक प्रक्रियेदरम्यान पेड न्यूजसंदर्भात सजगतेने काम करावे. आता निवडणुकीत सोशल मीडियाचा प्रभाव प्रचंड प्रमाणात वाढणार आहे. त्यामुळे पारंपरिक पद्धतीने होणाऱ्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांवरील प्रचार, जाहिरातींचे संनियंत्रणाबरोबरच निवडणुकीत सोशल मीडियावरील जाहिरातींचे प्रमाणिकरणही ‘एमसीएमसी’ला करायचे आहे. मतदानाचा दिवस व त्याच्या आधीचा दिवस अशा दोन्ही दिवसात वृत्तपत्रात प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातींचे प्रमाणिकरणही ‘एमसीएमसी’ने करायचे आहे. एखादी बातमी पेड न्यूज असल्याचे समितीचे मत निश्चित झाल्यानंतर उमेदवाराच्या खर्चात पेड न्यूजचा खर्च समाविष्ट करणे किंवा लोकप्रतिनिधित्व अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्याची कारवाई करू शकतात. सोशल मीडियावरून कुणीही व्यक्ती अपप्रचार, गैरसमज पसरवीत असल्यास त्याविरुद्ध भारतीय दंड विधान, सायबर गुन्हेविषयक कलम व अन्य प्रचलित कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात येतील, अशा सूचनाही जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिल्या.

प्रचार साहित्य प्रमाणीकरणासाठी नायब तहसीलदार यांच्याकडेही सादर करता येणार

 नागपूर जिल्ह्यातील एकूण १२ विधानसभा मतदारसंघासाठी १२ ठिकाणी एक खिडकी परवानगी सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे उमेदवार अथवा प्रतिनिधी निवडणुकीसाठी लागणारे प्रचारसाहित्य प्रमाणित करून घेण्यासाठी त्या त्या मतदारसंघातील नायब तहसीलदारांकडेही सादर करू शकतात. उमेदवारांनी छपाईपूर्वी प्रमाणित करण्यासाठी सादर केलेले प्रचारसाहित्य त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीकडे येईल, असेही जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी सांगितले.                     

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019collectorजिल्हाधिकारीMediaमाध्यमे