विदर्भात पुन्हा वादळी पावसाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:08 IST2021-04-09T04:08:55+5:302021-04-09T04:08:55+5:30
नागपूर : विदर्भातील चार जिल्ह्यांना पुन्हा वादळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. १० व ११ एप्रिलला ही ...

विदर्भात पुन्हा वादळी पावसाचा इशारा
नागपूर : विदर्भातील चार जिल्ह्यांना पुन्हा वादळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. १० व ११ एप्रिलला ही परिस्थिती अधिक तीव्र राहण्याची शक्यता असून, विदर्भातील बहुतेक सर्व जिल्ह्यांमध्ये शुक्रवारपासून पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. ११ तारखेपर्यंत ही स्थिती राहणार आहे.
हवामान विभागाच्या नागपूर प्रादेशिक केंद्राने वर्तविलेल्या अंदाजानुसार, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या चार जिल्ह्यांमध्ये १० व ११ एप्रिलला मेघगर्जनेसह वादळी पाऊस, विजा व गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. या वादळाचा वेग ताशी ३० ते ४० किलोमीटर राहणार असून, शेतकऱ्यांना सावधगिरीचा आणि खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने या तारखा ऑरेंज रंगात दर्शवून याची तीव्रता स्पष्ट केली आहे.
९ एप्रिलपासूनच मेघगर्जनेसह विजांचा आणि तुरळक पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीसह नागपूर, अमरावती, वर्धा, अकोला, यवतमाळ, बुलडाणा, वाशिम आदी जिल्ह्यांमध्ये ही शक्यता वर्तविण्यात आली आहे.
...
वादळ असेल ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाचे
१० व ११ एप्रिलला येणारे वादळ ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाचे असेल, असा इशारा देण्यात आला आहे. मागील महिन्यातही विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस आणि गारपीट झाली होती. नागपूर जिल्ह्यातील नरखेड, काटोल या दोन तालुक्यांना गारपीट आणि अवकाळी पावसाचा जबर फटका बसला होता.
...