शहरं
Join us  
Trending Stories
1
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
3
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
4
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
5
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
6
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
7
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
8
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
9
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
10
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
11
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
12
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
13
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
14
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
15
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
16
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
17
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
18
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
19
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
20
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल

येत्या चार दिवसात नागपूरसह वर्धा, गोंदियात वादळी पाऊस व गारपिटीचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 6:20 PM

Nagpur news हवामान केंद्राच्या नागपूर प्रादेशिक विभागाने पुढील चार दिवसात पावसाचा इशारा दिला आहे. १९ मार्चला नागपूरसह वर्धा आणि गोंदीया या तीन जिल्ह्यात वादळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा दिला आहे.

ठळक मुद्देताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाचे असेल वादळ

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : हवामान केंद्राच्या नागपूर प्रादेशिक विभागाने पुढील चार दिवसात पावसाचा इशारा दिला आहे. १९ मार्चला नागपूरसह वर्धा आणि गोंदीया या तीन जिल्ह्यात वादळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा दिला आहे. या वादळाचा वेग ताशी ३० ते ४० किलोमीटर राहील, असाही अंदाज वर्तविण्यात आला आहे.

१७ ते २० मार्च हे चार दिवस विदर्भात पावसाचे राहणार आहेत. हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार, १७ मार्चला नागपूर, वर्धा, चंद्रपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा आणि वाशिम या आठ जिल्ह्यांत तुरळक पावसाचा इशारा दिला आहे. १८ व २० मार्चला सर्व जिल्ह्यात पाऊस पडणार असून १९ मार्चला विजेच्या गडगडाटासह वादळी पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे. ३० ते ४० किलोमीटर प्रति ताशी वेगाचे हे वादळ नुकसान पोहोचवू शकते. यामुळे शेतकऱ्यांना आणि नागरिकांना हवामान खात्याने सावधगिरीचा इशारा दिला आहे.

मागील आठवड्यात आलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. भाजीपाला तसेच आंब्याचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. ही सल कायम असतानाच पुन्हा नवे अस्मानी संकट घोंगावत आहे.

सोमवारपासूनच वातावरणात बदल जाणवत आहे. दोन दिवसांपासून आकाश ढगाळलेले असून तापमानातही घट झाली आहे. नागपुरातील मंगळवारचे कमाल तापमान ३७.२ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. अमरावती आणि वर्धा येथील तापमान अनुक्रमे ३७.४ व ३७.५ अंश सेल्सिअस होते. विदर्भात सर्वाधिक तापमान चंद्रपूरचे ३९.२ अंश नोंदविले गेले तर सर्वात कमी तापमान गोंदीया येथे ३६ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. अकोला, बुलडाणा आणि गडचिरोली येथे ३८ अंश सेल्सिअस तर यवतमाळात ३८.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

.

टॅग्स :Rainपाऊस