हागणदारीमुक्ती चार राज्यात ‘वर्धा पॅटर्न’ राबविणार
By Admin | Updated: May 12, 2014 00:34 IST2014-05-12T00:34:25+5:302014-05-12T00:34:25+5:30
वर्धा निर्मल भारत ग्राम अभियानात वर्धा जिल्ह्याच्या कामाचे कौतुक राज्यस्तरावर करण्यात आले. या योजनेंतर्गत जिल्ह्याला देण्यात आलेले उद्दिष्ट राज्यात एकमेव वर्धा जिल्ह्याने पूर्ण केले.

हागणदारीमुक्ती चार राज्यात ‘वर्धा पॅटर्न’ राबविणार
श्रेया केने - वर्धा निर्मल भारत ग्राम अभियानात वर्धा जिल्ह्याच्या कामाचे कौतुक राज्यस्तरावर करण्यात आले. या योजनेंतर्गत जिल्ह्याला देण्यात आलेले उद्दिष्ट राज्यात एकमेव वर्धा जिल्ह्याने पूर्ण केले. यासाठी वर्धेला पुरस्कार देत हगणदारीमुक्तीकरिता राबविलेला पॅटर्न राज्यात राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महात्मा गांधी रोजगार हमी योजना व निर्मल भारत अभियानात स्वच्छतेतून समृद्धीकडे जाणाच्या मार्गात अद्यापही हगणदारी मुक्त न झालेली गावे अडसर ठरत आहेत. केंद्र व राज्य शासन या उपक्रमाकरिता कोट्यवधी रुपये खर्च करीत आहे; मात्र जनजागृतीचा अभाव असल्याने गावे हगणदारी मुक्त करण्यात अडचणी येत आहेत. गावागावात शौचालयाची निर्मिती करण्यात येत आहे. या योजनेची शहरी भागात प्रभावी अंमलबजावणी होत असली तरी गावांमध्ये मात्र घाणीचे साम्राज्य दिसून येते. गावाची शिव सुरू होताच दुर्गंधीचा सामना करावा लागतो. हे अभियान राबवितानाच व्यापक जनजागृती करणेही गरजेचे ठरत असल्याचे दिसून येते. योजनेतील निकषात न बसल्यामुळे अनेक ग्रामस्थांना अनुदान यादीतून वगळण्यात आले. शौचालयाचे बांधकाम करण्यासाठी शासनाकडून अनुदान राशी दिली जाते. बरेचदा बांधकाम पूर्ण न करता निधी परस्पर खर्च केला जाते. यामुळे योजनेच्या निकषात बदल करून बांधकाम पूर्ण केल्यानंतर अनुदान राशी देण्याचा निर्णय घेण्यात आला. असे झाले तरी ही योजना प्रभावीपणे राबविण्यात अनेक अडचणी निर्माण होत आहेत.