वर्धा-नांदेड रेल्वे मार्गाला मिळाले ३४७ कोटी रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:54 IST2021-02-05T04:54:31+5:302021-02-05T04:54:31+5:30

नागपूर : केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी १ फेब्रुवारीला संसदेत अर्थसंकल्प सादर केला. यात रेल्वेला किती फंड मिळाला याचा ...

Wardha-Nanded railway line gets Rs 347 crore | वर्धा-नांदेड रेल्वे मार्गाला मिळाले ३४७ कोटी रुपये

वर्धा-नांदेड रेल्वे मार्गाला मिळाले ३४७ कोटी रुपये

नागपूर : केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी १ फेब्रुवारीला संसदेत अर्थसंकल्प सादर केला. यात रेल्वेला किती फंड मिळाला याचा खुलासा पिंक बुक जारी झाल्यानंतर झाला आहे. यात विदर्भातील रेल्वे प्रकल्पांना भरघोस निधी देण्यात आला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या २७० किलोमीटर लांबीच्या वर्धा-नांदेड (व्हाया यवतमाळ, पुसद) या रेल्वे मार्गासाठी अर्थसंकल्पात ३४७ कोटी १ लाख ४४ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. लोकमत मीडिया प्रायव्हेट लिमिटेड एडिटोरियल बोर्डचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा यांनी या रेल्वेमार्गासाठी सातत्याने प्रयत्न केले. तत्कालीन रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांना त्यांनी वर्धा-नांदेड रेल्वेमार्गाचा प्रस्ताव दिला होता. या रेल्वेमार्गामुळे विदर्भाचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होणार आहे.

रेल्वेला मिळालेल्या इतर प्रकल्पात अमरावती-नरखेड रेल्वेमार्गाला (१३८ किमी) ४२ कोटी ४९ लाख ६० हजार रुपये, वर्धा सेवाग्राम नागपूर-सेवाग्राम थर्ड लाईन (७६.३ किमी) ४६ कोटी २१ लाख रुपये, वर्धा-बल्लारशाह चौथी लाईन (१३२ किमी) १४६ कोटी रुपये, इटारसी-नागपूर रेल्वेमार्गासाठी (२८० किमी) २६१ कोटी रुपये, वर्धा-नागपूर चौथ्या लाईनसाठी (७८.७०) १४८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच विदर्भातील वडसा-गडचिरोली दरम्यान नवी लाईन टाकण्यासाठी सांकेतिक रूपाने तरतूद करण्यात आली आहे. जबलपूर-गोंदिया-बालाघाट-कटंगीसह इतर संबंधित रेल्वेमार्गासाठी (२८५ किमी) १०० कोटी रुपये देण्यात आले आहेत. दुर्ग ते नागपूर दरम्यान १६० किलोमीटर वेगाने रेल्वेगाड्या चालविण्यासाठी रेल्वे गेटचे इंटरलॉकिंग करण्यात येणार आहे. त्यासाठी सांकेतिक रूपाने १ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय राजनांदगाव-नागपूर थर्ड लाईन (२२८ किमी) ४५० कोटी, जबलपूर-गोंदिया-बालाघाट-कटंगी लाईनसाठी १०० कोटी रुपये, छिंदवाडा-नागपूर मार्गासाठी (१४९ किमी) ४० कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली आहे. यासोबतच विदर्भातील रेल्वे रुळांचे नुतनीकरण, प्रवासी सुविधा, एस्केलेटरसाठी अर्थसंकल्पात भरघोस तरतुद करण्यात आली आहे.

Web Title: Wardha-Nanded railway line gets Rs 347 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.