वारकरी संप्रदाय आता एका क्लिकवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2020 11:15 IST2020-10-27T11:15:25+5:302020-10-27T11:15:51+5:30

Nagpur News वारकरी संप्रदायाची इत्थंभूत माहिती 'वारकरीविश्व' या संकेतस्थळावर सादर होत आहे.

Warakari now with one click | वारकरी संप्रदाय आता एका क्लिकवर

वारकरी संप्रदाय आता एका क्लिकवर


लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : इंटरनेटच्या काळात संपूर्ण विश्व आता जगाच्या कानाकोपऱ्यात असलेल्या व्यक्तीला एका क्लिकवर उपलब्ध होत आहे. हाच धागा वारकरी संप्रदायानेही पकडला आहे आणि या संप्रदायाची इत्थंभूत माहिती 'वारकरीविश्व' या संकेतस्थळावर सादर होत आहे.
विश्व वारकरी सेवा संस्थेच्या वतीने ह्यवारकरीविश्वह्ण हे मोबाईल अ?ॅप व संकेतस्थळ सादर केले असून, यात वारकरी संप्रदायाचा हजारो वषार्चा इतिहास, परंपरा, संत, ग्रंथ, भारताबाहेरील वारकरी संप्रदाय, कीर्तनकार, प्रवचनकार, कथाकार, गायनाचार्य, मृदंगाचार्य, टाळकरी, विणेकरी, देवस्थान, शिक्षण संस्था, सामाजिक संस्था आदींची माहिती सर्वसामान्यांना एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. या मोबाईल अप्लिकेशन व संकेतस्थळाचे लोकार्पण होणार आहे, अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हभप संदीप कोहळे यांनी दिली.

Web Title: Warakari now with one click

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.