मानवी तस्करीबद्दल जागृतीसाठी वॉक फॉर फ्रीडम
By दयानंद पाईकराव | Updated: October 12, 2023 19:01 IST2023-10-12T19:01:10+5:302023-10-12T19:01:27+5:30
नागपुरात १४ ऑक्टोबरला सकाळी १० वाजता झाशी राणी चौकातील मातृ सेवा संघ हॉस्पिटल येथून वॉक फॉर फ्रीडमला सुरुवात होणार आहे.

मानवी तस्करीबद्दल जागृतीसाठी वॉक फॉर फ्रीडम
नागपूर : मानवी तस्करीबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी युवा रुरल असोसिएशनच्या वतीने १४ ऑक्टोबरला नागपूर, भंडारा, अमरावतीसह देशभरात १०० ठिकाणी वॉक फॉर फ्रीडमचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संघटनेच्या प्रकल्प समन्वयक अर्चना पाली बासू यांनी पत्रकार परिषदेत दिली.
नागपुरात १४ ऑक्टोबरला सकाळी १० वाजता झाशी राणी चौकातील मातृ सेवा संघ हॉस्पिटल येथून वॉक फॉर फ्रीडमला सुरुवात होणार आहे. ही वॉक फॉर फ्रीडम झाशी राणी चौक ते संविधान चौकापर्यंत काढण्यात येणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून सहपोलिस आयुक्त अश्वती दोरजे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव सचिन पाटील,क मातृ सेवा संघ हॉस्पिटलच्या सचिव लता देशमुख यांची उपस्थिती लाभणार आहे. यात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन अर्चना पाली बासू यांनी केले आहे.