जागतिक जल दिनानिमित 'सेव्ह वॉटर' वॉक-ए-थॉन

By मंगेश व्यवहारे | Published: March 25, 2023 02:00 PM2023-03-25T14:00:39+5:302023-03-25T14:01:41+5:30

नागपूर : जागतिक जल दिनाच्या पार्श्वभूमीवर ऑरेंज सिटी वॉटर ने "पाणी वाचवा" आणि पिण्याच्या पाण्याचा विवेकपूर्ण वापर याविषयी जनजागृती ...

Walk-a-thon for 'Save Water' campaign on the occasion of World Water Day in nagpur | जागतिक जल दिनानिमित 'सेव्ह वॉटर' वॉक-ए-थॉन

जागतिक जल दिनानिमित 'सेव्ह वॉटर' वॉक-ए-थॉन

googlenewsNext

नागपूर : जागतिक जल दिनाच्या पार्श्वभूमीवर ऑरेंज सिटी वॉटर ने "पाणी वाचवा" आणि पिण्याच्या पाण्याचा विवेकपूर्ण वापर याविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने वॉक-ए-थॉनचे आयोजन केले होते. सिव्हिल लाईन्स परिसरातील वॉकर स्ट्रीटवर सर्व १० झोनमधील सुमारे ३५० ओसीडब्ल्यूचे पुरुष आणि महिला कर्मचाऱ्यांनी यात सहभाग नोंदविला होता.

वॉकर्स स्ट्रीटवर ३ किमी चालत असताना पोलीस जिमखान्यापासून घोषणाबाजी आणि मॉर्निंग वॉकर्सच्या भेटीगाठी घेऊन जलसंधारण, पिण्याच्या पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचा संदेश नागरिकांना देण्यात आला. याआधी डेकॅथलॉनतर्फे काही सराव व्यायाम आणि झुम्बा अॅक्टिव्हिटी आयोजित करण्यात आल्या होत्या. यावेळी ओसीडब्ल्यूचे सीईओ संजय रॉय, संचालक, केएमपी सिंग, विनोद गुप्ता, राजीथ अय्याथन, अमोल पांडे, कुलदीप सिंग, प्रकाश महाजन आदी सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मिताली नायडू आणि अरवा हुसैन यांचे सहकार्य लाभले

Web Title: Walk-a-thon for 'Save Water' campaign on the occasion of World Water Day in nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.