नागपुरात निघाली सरकार जगाओ, लॉकडाऊन हटाओ रॅली.. नाराज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आपला रोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 15:12 IST2021-07-27T15:11:36+5:302021-07-27T15:12:38+5:30
Nagpur News लॉकडाऊनच्या नावाखाली संध्याकाळी चार वाजेपर्यंतच दुकाने उघडी ठेवण्याच्या सरकारच्या धोरणाच्या विरोधात नागपुरातील व्यापाऱ्यांनी मंगळवारी दुपारी सरकार जगाओ.. लॉकडाऊन हटाओ मोर्चा काढला.

नागपुरात निघाली सरकार जगाओ, लॉकडाऊन हटाओ रॅली.. नाराज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आपला रोष
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: लॉकडाऊनच्या नावाखाली संध्याकाळी चार वाजेपर्यंतच दुकाने उघडी ठेवण्याच्या सरकारच्या धोरणाच्या विरोधात नागपुरातील व्यापाऱ्यांनी मंगळवारी दुपारी सरकार जगाओ.. लॉकडाऊन हटाओ मोर्चा काढला. यात नागपुरातील व्यापारी वर्ग मोटरसायकल व कारमधून मोठ्या प्रमाणात सहभागी झाला होता.
सरकार जगाओ, वाणिज्य बचाओ संषर्घ समितीच्या वतीने हा मोर्चा नागपुरातल्या सर्व प्रमुख बाजारपेठांमध्ये फिरवण्यात आला. मंगळवारी दुपारी १ च्या सुमारास हिस्लॉप कॉलेजवरून निघालेला हा मोर्चा लॉ कॉलेज चौक, कॉफी हाऊस चौक, शंकरनगर, झाशी राणी चौक,पंचशील, मेहाडिया चौकावरून टेलिफोन एक्सचेंजपर्यंत जाऊन रेल्वेस्टेशनवरून झाशी राणी पुतळ््यापाशी समाप्त झाला. येथील म.गांधीजींच्या पुतळ्याला माल्यार्पण करून त्याची सांगता करण्यात आली.
अर्ध्या वेळेतील व्यवसायावर सरकारने पूर्ण कराची अपेक्षा करू नये, लॉकडाऊन समाप्त करा अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.