शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

येलो फिव्हर लसीकरणाची प्रतीक्षाच : डागा रुग्णालयात होणार होते केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2019 9:20 PM

केनिया किंवा दक्षिण अमेरिकेतील काही देशांमध्ये जाणाऱ्यांना ‘येलो फिव्हरची लागण होऊ नये म्हणून नागपूरच्या डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयात ‘येलो फिव्हर’ लसीकरण केंद्राला दोन वर्षांपूर्वी मंजुरी मिळाली.

ठळक मुद्देप्रवाशांना गाठावी लागत आहे मुंबई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केनिया किंवा दक्षिण अमेरिकेतील काही देशांमध्ये जाणाऱ्यांना ‘येलो फिव्हरची लागण होऊ नये म्हणून नागपूरच्या डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयात ‘येलो फिव्हर’ लसीकरण केंद्राला दोन वर्षांपूर्वी मंजुरी मिळाली. दरम्यानच्या काळात एका आरोग्य अधिकाऱ्यासह परिचारिका, फार्मसिस्ट व कर्मचाऱ्याला याबाबत प्रशिक्षण दिले. परंतु त्यांची बदली झाल्याने आता मुंबई येथील केंद्रीय आरोग्य विभाग प्रशिक्षित कर्मचारी नसल्याचे कारण देऊन परवानगी नाकारली आहे. परिणामी, या लसीसाठी मध्य भारतातील लोकांना मुंबई गाठावी लागत आहे.प्रतिबंधात्मक उपाय म्हणून प्रत्येक भारतीयाला आफ्रिकन देशात जाण्यापूर्वी ‘येलो फिव्हर' लस टोचली जाते. आंतरराष्ट्रीय व्हिजा नियमांतर्गत ही लस टोचून घेणे बंधनकारक आहे. सध्या आफ्रिकन देशात जाण्यास इच्छुक असलेल्या प्रवाशांना लस टोचण्यासाठी राज्यात आरोग्य विभागाची मुंबई व पुण्यातच सोय आहे. नागपुरात एका खासगी इस्पितळाला याची परवानगी दिली आहे. परंतु येथे लसीचा तुटवडा, तसेच पाच ते १५ हजारापर्यंत मोठी किंमतही चुकवावी लागत असल्याच्या अनेकांच्या तक्रारी आहेत.रुग्णालय प्रशासनाकडून पाठपुरावाच नाहीनागपूरच्या शासकीय सेवेत हे लसीकरण केंद्र सुरू झाल्यास मध्य भारतातील नागरिकांचा वेळ आणि पैसा वाचणार होता. शिवाय मुंबईच्या केंद्रात होणारी गर्दी कमी होणार होती. ही बाब लक्षात घेत २०१६ मध्ये आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल यांनी या संदर्भात प्रस्ताव पाठविला. त्याला मंजुरी मिळाली. डागा रुग्णालयात हे केंद्र स्थापित होणार होते. त्या अनुषंगाने तत्कालीन सार्वजनिक आरोग्य विभागाच्या तत्कालिन सचिव व संचालक यांनी डागाला भेट दिली. लसीकरण केंद्राच्या प्रस्तावित जागेची पाहणी केली. एक वैद्यकीय अधिकाऱ्यासह पाच जणांना प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले. परंतु प्रशिक्षण प्राप्त करून येताच वैद्यकीय अधिकाऱ्याची बदल्या झाल्या. यामुळे दुसºया वैद्यकीय अधिकाऱ्याला प्रशिक्षणासाठी पाठविण्याचा प्रस्ताव मुंबई येथील केंद्रीय आरोग्य विभागाकडे पाठविण्यात आला. मात्र डागा प्रशासनाने याचा पाठपुरवा केला नसल्याने अद्यापही हे केंद्र कागदावरच आहे.मेडिकलनेही पाठविला होता प्रस्तावदोन वर्षांपूर्वी नागपूर मेडिकलच्या जनऔषध वैद्यकशास्त्र विभागाकडून येलो फिव्हर लसीकरण केंद्राचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्यात आला होता. परंतु अद्यापही याला मंजुरी मिळाली नाही. विशेष म्हणजे, यासाठी अधिकृत अधिकारी म्हणून डॉ. अविनाश गावंडे व डॉ. समीर गोलावार यांची नेमणूक करण्यात आली होती.

टॅग्स :Daga Hospitalडागा हॉस्पिटलHealthआरोग्य