बेवारस मनाेरुग्णांना लसीची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:07 IST2021-04-19T04:07:37+5:302021-04-19T04:07:37+5:30
नागपूर : प्रादेशिक मनाेरुग्णालयामध्ये गेल्या महिनाभरात जवळपास ८० रुग्ण आणि २० कर्मचारी काेराेना पाॅझिटिव्ह आढळून आले. यादरम्यान रुग्णालयात असलेल्या ...

बेवारस मनाेरुग्णांना लसीची प्रतीक्षा
नागपूर : प्रादेशिक मनाेरुग्णालयामध्ये गेल्या महिनाभरात जवळपास ८० रुग्ण आणि २० कर्मचारी काेराेना पाॅझिटिव्ह आढळून आले. यादरम्यान रुग्णालयात असलेल्या १८० मनाेरुग्णांना अद्याप काेराेना प्रतिबंधक लस देण्यात आलेली नाही. रुग्णालयाकडून या मनाेरुग्णांचे लसीकरण करण्यासाठी आराेग्य विभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे, मात्र विभागाकडून परवानगीचा आदेश न आल्याने लसीकरण रखडले असल्याचे सांगण्यात येत आहे.
हे असे रुग्ण आहेत ज्यांना महामारीच्या भयावहतेची जाणीवही नाही. मनाेरुग्णालय हेच त्यांचे पालक आहे. लसीकरणाच्या ऑनलाइन नाेंदणीसाठी आधार कार्ड असणे गरजेचे असते. त्यानुसार ६० रुग्णांचे आधार कार्ड बनविण्यात आले. मात्र उरलेल्यांचे रखडले. रुग्णालयात नव्याने दाखल ३६ मनाेरुग्णांच्या पालकांकडून लस देण्याबाबत परवानगी घेणेही बाकी राहिले आहे. दरम्यान, काेराेनाचे संक्रमण वाढत असल्याने रुग्णालय व्यवस्थापनाने पुरुष व महिला रुग्णांसाठी स्वतंत्र काेराेना वाॅर्डाची व्यवस्था केली आहे.
सध्या परवानगी मिळालेली नाही
रुग्णालयातील ४५ वर्षे व त्यापेक्षा अधिक वयाच्या २१६ मनाेरुग्णांना काेराेना प्रतिबंधक लस द्यायची आहे. आराेग्य विभागाकडे याबाबत परवानगीसाठी प्रस्ताव सादर केला आहे. महापालिकेशीही चर्चा करण्यात आली आहे. लसीकरणाची गरज लक्षात घेता ५० टक्के रुग्णांचे आधार कार्ड तयार करण्यात आले आहे. मात्र उरलेल्यांचे आधार कार्ड बनविण्याची प्रक्रिया थांबल्याने ते काम रखडले.
- डाॅ . पुरुषाेत्तम मडावी, वैद्यकीय अधीक्षक, प्रादेशिक मनाेरुग्णालय