शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

‘अच्छे दिन’ची उद्योजकांना प्रतीक्षा

By admin | Updated: February 20, 2015 02:13 IST

छोट्या उद्योगांना वित्तीय मदतीसाठी वेगळी संस्था स्थापन करावी. बचतीला प्रोत्साहन देण्यासाठी गुंतवणुकीची करमुक्त मर्यादा दीड लाखांवरून पाच लाखांवर न्यावी.

विकासावर भर द्याछोट्या उद्योगांना वित्तीय मदतीसाठी वेगळी संस्था स्थापन करावी. बचतीला प्रोत्साहन देण्यासाठी गुंतवणुकीची करमुक्त मर्यादा दीड लाखांवरून पाच लाखांवर न्यावी. महिलांच्या सुरक्षेसाठी (वित्तीय) योजनेची सरकारने घोषणा करावी. भागीदारी फर्म आणि छोट्या कंपन्यांना सूट द्यावी. व्यापाऱ्यांच्या सोयीसाठी आयकर नियम सरळसोपे करावेत. नक्षलग्रस्त भागात उद्योग सुरू करण्यासाठी प्रोत्साहनपर योजना व करसवलत द्यावी. सर्वसमावेशक विकास, ग्रामीण भागात वीज व शिक्षणावर भर असावा.-बी.सी. भरतीया, राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारतीय व्यापारी महासंघकरटप्पा वाढवायंदाच्या बजेटपासून बऱ्याच अपेक्षा आहेत. मध्यमवर्गीय व उद्योजकांना ‘अच्छे दिन’ची सुरुवात होण्याची प्रतीक्षा आहे. करसवलत अडीचवरून तीन लाखांवर न्यावी. जीएसटीच्या अंमलबजावणीसाठी काही फंडिंग करावी. जीएसटी लागू झाल्याने सर्वस्तरातून लोकांना करापासून दिलासा मिळेल. सेवाकराचा टप्पा वाढत असल्याचे नेहमीच बघतो. त्यावर सरकारने जास्त भर देऊ नये. जागतिक मंदीत सरकारने लोकांवर प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष कराचा बोझा टाकू नये. मध्यमवर्गीयांना दिलासा मिळावा.- तेजिंदरसिंग रेणू, सचिव, विदर्भ टॅक्सपेअर असोसिएशनउद्योजकांना कर्ज द्याकेंद्र सरकारने सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी लागू केलेली के्रडिट गॅरंटी ट्रस्ट फॉर मिडियम स्मॉल इंडस्ट्रीज स्कीम अर्थात ‘सीजीटीएमएसआय’ या योजनेच्या धर्तीवर तरुण दलित उद्योजकांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने वेगळी योजना सुरू करावी. एक कोटींपर्यंत कर्जाला तारण द्यावे लागणार नाही. कर्जमर्यादा एक कोटींवरून पाच कोटींवर नेल्यास दलित युवक मुख्य प्रवाहात येतील. त्यामुळे देशाच्या विकासात नक्कीच हातभार लागेल. सरकारने जीएसटीसाठी अतिरिक्त फंडिंग करावे. - अरुण खोब्रागडे संरक्षक, ‘डिक्की’, नागपूर चॅप्टर व्याजदर कमी करावेलघु आणि मध्यम उद्योगात मंदीचे वातावरण असून, प्रोत्साहन देण्यासाठी काही सवलती केंद्र सरकारने द्याव्यात. उद्योगाची उलाढाल पाहता अबकारी कराची मर्यादा पाच कोटींपर्यंत वाढविण्याची घोषणा व्हावी. सर्व्हिस टॅक्सची मर्यादा वाढवावी. कामगार कायद्यात दोघांना पूरक अशी सुधारणा व्हावी. गुणवत्तापूर्ण उत्पादनांसाठी कामगारांची जबाबदारी निश्चित करावी. लघु उद्योग देशाच्या विकासाचा कणा असल्याने त्यांच्याकडून बँकांनी कॉर्पोरेट क्षेत्राप्रमाणे विशेष व्याजदर आकारावेत व प्रोत्साहन द्यावे.- कॅ ़ सी.एम. रणधीर, अध्यक्ष,एमआयए इंडस्ट्रीज असोसिएशननवे कर नसावेतविविध करांच्या आकारणीमुळे उद्योग, व्यावसायिकांना बराच त्रास होतो. कर आकारणी तर करावीच, पण त्याची प्रक्रिया सरळसोपी असावी. यंदा नवे कर नसावेत. पायाभूत सुविधांचा विकास साधताना सरकारने रोजगार, कौशल्य विकास आणि क्वालिटी मॅनपॉवरवर लक्ष केंद्रित करावे. ऊर्जा क्षेत्रावर कटाक्षाने लक्ष द्यावे. मॅन्युफॅक्चर उद्योगांसाठी क्वालिटी, क्वान्टिटी आणि दर महत्त्वाचे ठरते. बँकांचे व्याजदराचे दर कमी करावेत. त्यामुळे मंदीची मरगळ दूर होण्यास मदत होईल. ग्रामीण विकासाचे धोरण जाहीर करावे. -अतुल पांडे, अध्यक्ष,विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनजीएसटीवर ठोस द्याग्रामीण भागाचा विकास साधताना केंद्र सरकारला सर्वसामान्य आणि उद्योजकांसाठी कर सवलतीच्या नव्या योजनांची घोषणा करण्याची गरज आहे. सरकारने अघोषित खर्च कमी करावा, जेणेकरून वित्तीय तूट कमी होऊन जीडीपी वाढेल. उद्योगांना कमी व्याजदरात आर्थिक पुरवठा होण्यासाठी काही ठोस उपाययोजना सरकारने कराव्यात. यावर्षी करप्रणालीत मोठ्या बदलांची अपेक्षा नसली तरीही जीएसटीसाठी काही ठोस उपाययोजनांची घोषणा व्हावी. त्यामुळे उद्योगांना प्रोत्साहन मिळेल. करप्रणाली आणि टीडीएस हा विषयच सरळसोपा करावा. - अश्विनी अग्रवाल, अध्यक्ष,सीए संस्था, नागपूरउद्योगांना सूट हवीदेशाच्या निर्यातीत, जीडीपीमध्ये आणि रोजगार उपलब्ध करून देण्यात लघु उद्योगांचा ४० टक्के वाटा आहे. अशा उद्योगांकडे सरकारने विशेष लक्ष देताना त्यांना बँकांतर्फे कमी व्याजदरात कर्ज आणि सूट द्यावी. प्रत्यक्ष कराची मर्यादा पाच लाखांपर्यंत वाढवावी. ही मर्यादा वाढविताना एक कोटींवरील उत्पन्नांवर अधिभार आकारावा. अबकारी करातील सूट१.५ कोटींवरून पाच कोटींवर न्यावी. ईएसआयसी व पीएफ कायद्यांमध्ये उद्योजकांनुसार सुधारणा करावी. करप्रणाली संपवून जीएसटी लागू करावा. त्यामुळे उद्योगाला संजीवनी मिळेल. - प्रदीप खंडेलवाल, अध्यक्ष,बुटीबोरी मॅन्युफॅक्चरिंग असो.