शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
2
मतदार यादीतून वगळलेले ६५ लाख कोण? तीन दिवसांत सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश
3
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेले मुख्यालय पुन्हा बांधण्यासाठी जैशचा प्रमुख पुन्हा सक्रिय; मसूद अझहरने अनेकांकडे देणग्या मागितल्या
5
नवजात लेकीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकलं पण 'त्याने' जीवदान दिलं, शरीराला लागलेले किडे
6
RBI च्या निर्णयानंतर गुंतवणूकदारांना झटका! विप्रोसह 'या' क्षेत्रात मोठी घसरण, कुठे झाली वाढ?
7
“जनभावनेचा आदर करणारे हे सरकार, आम्ही...”; ‘महादेवी’ परतण्याबाबत एकनाथ शिंदेचे मोठे विधान
8
लग्नाचं निमंत्रण दिलं नाही, सहकाऱ्यांनी एचआरकडे केली तरुणीची तक्रार, त्यानंतर घडलं असं काही...
9
"कित्येकांनी बलिदान दिले, शिरांचे ढीग लागले, पण धर्म सोडला नाही"- मोहन भागवत
10
एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी; अमित शाहांशी बैठकीत काय चर्चा झाली? खुद्द उपमुख्यमंत्री म्हणाले...
11
"डोकं फिरवू नका, मी मंत्री, तुम्ही मलाच न सांगता...", PWD अधिकाऱ्यावर संतापले दयाशंकर सिंह
12
जगाला आपल्या धाकात ठेऊ पाहणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची संपत्ती किती? उत्पन्नाचा खरा स्रोत कोणता?
13
एकावर एक बोनस शेअर देणार 'ही' कंपनी; सोबत डिविडंडही मिळणार; गुंतवणुकदारांना दुप्पट फायदा
14
आधार ओटीपी वापरून ITRचं ई-व्हेरिफिकेशन करा, अन्यथा रिटर्न अवैध ठरेल; पाहा संपूर्ण प्रोसेस
15
८८२ कोटींचा खर्च, २०२८ मध्ये होणार पूर्ण; ८ ऑगस्टला सीतामातेच्या जानकी मंदिराचे भूमिपूजन
16
'कायद्याच्या कचाट्यात महादेवी हत्तीला अडकवू नका, ... तोपर्यंत लढा सुरूच राहणार'; राजू शेट्टींनी स्पष्टच सांगितलं
17
वॉशिंग मशिन वापरताना ‘ही’ किरकोळ चूक जीवावर बेतली; तरुणाचा मृत्यू; करायला गेला एक आणि..
18
बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर...
19
Wasim Jaffer: वसीम जाफरवर मोठी जबाबदारी, आता विदर्भातील खेळाडूंना शिकवतील फलंदाजीचे धडे!
20
ICC Test Ranking : मियाँ 'मॅजिक'नंतर 'मार मुसंडी' शो! सिराजला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट

कॉक्लीअर इम्प्लांटच्या प्रतीक्षेत १५ चिमुकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 23:10 IST

शासकीय रुग्णालयांमध्ये कॉक्लीअर इम्प्लांट करणारे नागपुरातील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) हे पहिले सेंटर ठरले आहे. १० सप्टेंबर २०१७ रोजी सुरू झालेल्या या सेंटरमध्ये शनिवारी पुन्हा तीन बालकांवर यशस्वी ‘कॉक्लीअर इम्प्लांट’ झाले. आतापर्यंत ‘इम्प्लांट’ झालेल्या रुग्णांची संख्या आठ झाली आहे. यातच दर मंगळवारी विशेष‘ओपीडी’ सुरू केल्याने रुग्णांची संख्या वाढली आहे. तूर्तास १५ रुग्ण या शस्त्रक्रियेच्या प्रतीक्षेत आहेत, अशी माहिती मेयोच्या कान, नाक व घसा (ईएनटी) विभागाचे प्रमुख डॉ. जीवन वेदी यांनी पत्रपरिषदेत दिली.

ठळक मुद्देडॉ. जीवन वेदी : मेयोत आणखी तीन चिमुल्यांवर शस्त्रक्रिया

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शासकीय रुग्णालयांमध्ये कॉक्लीअर इम्प्लांट करणारे नागपुरातील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) हे पहिले सेंटर ठरले आहे. १० सप्टेंबर २०१७ रोजी सुरू झालेल्या या सेंटरमध्ये शनिवारी पुन्हा तीन बालकांवर यशस्वी ‘कॉक्लीअर इम्प्लांट’ झाले. आतापर्यंत ‘इम्प्लांट’ झालेल्या रुग्णांची संख्या आठ झाली आहे. यातच दर मंगळवारी विशेष‘ओपीडी’ सुरू केल्याने रुग्णांची संख्या वाढली आहे. तूर्तास १५ रुग्ण या शस्त्रक्रियेच्या प्रतीक्षेत आहेत, अशी माहिती मेयोच्या कान, नाक व घसा (ईएनटी) विभागाचे प्रमुख डॉ. जीवन वेदी यांनी पत्रपरिषदेत दिली.डॉ. वेदी म्हणाले, उपचार असूनही अनेकांवर आयुष्यभर मूकबधिर अवस्थेत जीवन जगावे लागते. श्रवणदोषावर ‘कॉक्लीअर इम्प्लांट’ शस्त्रक्रिया पर्याय ठरत आहे. मेयो रुग्णालयातील ‘ईएनटी’ विभागात ‘कॉक्लीअर इम्प्लांट’ सेंटर सुरू झाल्याने याचा फायदा रुग्णांना होत आहे. या इम्प्लांटमुळे शब्द आणि त्याची संरचना त्या मुलाच्या मेंदूपर्यंत थेट जाते. शब्द समजण्यास व बोलण्यास मदत होते. इम्प्लांटसाठी बाळाचा एक ते पाच वर्षापर्यंतचा काळ सर्वोत्तम असतो. ‘इम्प्लांट’नंतर तीन वर्षे ‘स्पीच थेरपी’ द्यावी लागते. त्यानंतर रुग्णाला चांगले बोलता येते. विशेष म्हणजे, खासगी रुग्णालयात या सर्वाला सात ते दहा लाखांचा खर्च येतो. परंतु केंद्र सरकारच्या ‘स्कीम आॅफ असिस्टन्स टू डिसेबल पर्सनस् फॉर परचेस’मुळे (एडीआयपी) रुग्णाला एक रुपयाचा खर्च येत नाही. परंतु ही योजना आर्थिक दुर्बल घटकांसाठी आहे. ‘एडीआयपी’ संपूर्ण देशाच्या सेंटरला ‘कॉक्लीअर इम्प्लांट’ यंत्र पुरविते. यामुळे यंत्र यायलाच आठ-नऊ महिन्यांचा वेळ लागतो. सध्या १५ रुग्ण प्रतीक्षा यादीत आहे, असेही ते म्हणाले.शनिवार ४ आॅगस्ट रोजी तीन चिमुकल्यांवर यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. ही शस्त्रक्रिया प्रसिद्ध ईएनटी सर्जन पद्मश्री डॉ. मिलिंद कीर्तने यांच्या मार्गदर्शनात डॉ. जीवन वेदी यांनी ही शस्त्रक्रिया केली. त्यांना भूलतज्ज्ञ डॉ. सोनाली खोब्रागडे व डॉ. विकास चौधरी यांच्यासह डॉ. रितेश शेळकर व ईएनटी विभागाची चमू, कार्यरत परिचारिका व कर्मचाऱ्यांचे सहकार्य मिळाले.यांच्यावर झाली शस्त्रक्रियाक्रितीदीपा सरकार (४) रा. चंद्रपूर, रेणुका शिंदे (५) रा. नागपूर व शीतल सोनकुसरे (४) रा. भंडारा या चिमुकल्यांवर शनिवारी कॉक्लीअर इम्प्लांट शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली.जन्मत:च बाळांची तपासणीडॉ. वेदी म्हणाले, आपल्याकडे जन्मत:च श्रवण क्षमतेची चाचणी करण्याचे प्रमाण फारच कमी आहे. यामुळे मूकबधिरतेचे प्रमाण मोठे आहे. ते कमी करण्यासाठी मेयोनेही पुढाकार घेतला आहे. रुग्णालयात प्रसूती झालेल्या प्रत्येक बाळाची ईएनटी विभागाकडून श्रवण क्षमतेची चाचणी घेणे सुरू केले आहे.

टॅग्स :indira gandhi medical college, Nagpurइंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो)nagpurनागपूर