‘पॉलिटेक्निक’च्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 04:05 IST2020-12-07T04:05:47+5:302020-12-07T04:05:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे अखेर ‘पॉलिटेक्निक’च्या ‘कॅप’ फेºयांचे वेळापत्रक जारी करण्यात आले आहे. ऑगस्ट महिन्यात अर्ज ...

‘पॉलिटेक्निक’च्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे अखेर ‘पॉलिटेक्निक’च्या ‘कॅप’ फेºयांचे वेळापत्रक जारी करण्यात आले आहे. ऑगस्ट महिन्यात अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली होती व त्यानतंर ‘कॅप’चे वेळापत्रक घोषित झाले नव्हते. अखेर ११ डिसेंबरपासून ही प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यामुळे प्रतिक्षेत असलेल्या हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
दहावीनंतर अकरावीत प्रवेश न घेता पॉलीटेक्निकच्या पदविका अभ्यासक्रमात प्रवेश घेऊन आपल्या करिअरचा मार्ग शोधणारे बरेच विद्यार्थी असतात. विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी १० ऑगस्टपासून केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेची सुरुवात करण्यात आली. मात्र या प्रक्रियेला विद्यार्थ्यांचा हवा तसा प्रतिसाद लाभला नाही व फार कमी प्रमाणात अर्ज आले होते. अखेर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली.
तंत्रशिक्षण संचालनालयाने प्रक्रिया सुरू झाल्यानंतर तब्बल चार महिन्यांनंतर ‘कॅप’च्या फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार ११ डिसेंबरपासून प्रक्रियेला सुरुवात होईल. दोन फेऱ्यातच प्रवेशनिश्चिती होणार असून २१ डिसेंबरपासून वर्ग सुरू करण्यात यावे असे वेळापत्रकात नमूद आहे.
वेळापत्रक
पहिल्या फेरीसाठी जागांची रचना जाहीर करणे - ११ डिसेंबर
पहिल्या फेरीसाठी पसंतीक्रमाचा अर्ज भरणे - १२ ते १४ डिसेंबर
तात्पुरते जागा वाटप घोषित करणे - १६ डिसेंबर
मिळालेल्या जागेची ‘ऑनलाईन’ स्वीकृती - १७ ते १८ डिसेंबर
महाविद्यालयांत जाऊन प्रवेश निश्चिती - १७ ते १९ डिसेंबर
दुसऱ्या फेरीसाठी रिक्त जागांची रचना - २० डिसेंबर
दुसऱ्या फेरीसाठी पसंतीक्रमाचा अर्ज भरणे - २१ ते २२ डिसेंबर
तात्पुरते जागा वाटप घोषित करणे - २४ डिसेंबर
मिळालेल्या जागेची ‘ऑनलाईन’ स्वीकृती - २५ ते २८ डिसेंबर
महाविद्यालयांत जाऊन प्रवेश निश्चिती - २५ ते २९ डिसेंबर
शैक्षणिक उपक्रमाची सुरुवात - २१ डिसेंबर
कागदपत्रांची पडताळणी ३० मे ते १८ जून
तात्पुरती गुणवत्ता यादी १९ जून
आक्षेप २० जून ते २१ जून
अंतिम गुणवत्ता यादी २४ जून
पहिल्या फेरीसाठी पसंतीक्रमाचा अर्ज भरणे २५ जून ते २८ जून
तात्पुरती प्रवेशयादी १ जुलै
दुसऱ्या फेरीसाठी पसंतीक्रमाचा अर्ज भरणे९ जुलै ते १२ जुलै
तात्पुरती प्रवेशयादी १५ जुलै
तिसऱ्या फेरीसाठी पसंतीक्रमाचा अर्ज भरणे २३ जुलै ते २६ जुलै
तात्पुरती प्रवेशयादी २९ जुलै
शैक्षणिक सत्राला सुरुवात ५ ऑगस्ट
समुपदेशन प्रवेश फेरी ३१ जुलै