शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

वाहनाच्या धडकेत वाघिणीचा मृत्यू, नागपूरमधील बाजारगाव शिवारातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2017 21:02 IST

भरधाव अज्ञात वाहनाने महामार्ग ओलाडणा-या वाघिणीला जोरदार धडक दिली. त्यात त्या वाघिणीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना नागपूर - अमरावती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक - ६ वरील बाजारगाव परिसरात असलेल्या पेपर मिल जवळील घुलीवाला पुलावर शुक्रवारी सायंकाळी ५.४५ वाजताच्या सुमारास घडली.

बाजारगाव : भरधाव अज्ञात वाहनाने महामार्ग ओलाडणा-या वाघिणीला जोरदार धडक दिली. त्यात त्या वाघिणीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना नागपूर - अमरावती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक - ६ वरील बाजारगाव परिसरात असलेल्या पेपर मिल जवळील घुलीवाला पुलावर शुक्रवारी सायंकाळी ५.४५ वाजताच्या सुमारास घडली.या परिसरात बोर व्याघ्र प्रकल्प असून, कळमेश्वर तालुक्यातील जंगली भाग लागूनच आहे. त्यामुळे या परिसरात मागील काही दिवसांपासून वाघ व बिबट्यांसह अन्य वन्यप्राण्यांचा वावर वाढला आहे. दरम्यान, ही वाघीण सायंकाळी राष्ट्रीय महामार्गावरील घुलीवाला पूल ओलांडत असताना भरधाव अज्ञात वाहनाने तिला जोरदार धडक दिली. त्यात गंभीर दुखापत झाल्याने तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला.माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी आलोकर आणि कोंढाळी पोलिसांनी घटनास्थळ गाठले. तिचे वय पाच ते सहा वर्षे असल्याची माहिती आलोकर यांनी दिली. याच वाघिणीने आठवडाभरापूर्वी पाचनवरी शिवारात एका गाईची शिकार केली होती. विशेष म्हणजे, मागील काही दिवसांपासून या घुलीवाला पुलावर वन्यप्राण्यांचा अपघाती मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत आहे. मागील वर्षी याच पुलावर वाहनाच्या धडकेत एका बिबट्याचा व त्यापूर्वी हरणाचा मृत्यू झाला होता. या बाबी वन विभागातील अधिकाºयांना माहिती असूनही कोणतीही प्रभावी उपाययोजना करण्यात आल्या नाही. 

(फोटो - मिलिंद डोर्लिकर)

 

 

टॅग्स :nagpurनागपूरTigerवाघDeathमृत्यू