वेतनाचा तिढा कायम
By Admin | Updated: May 10, 2014 02:21 IST2014-05-10T01:28:57+5:302014-05-10T02:21:37+5:30
जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील कर्मचाऱ्यांना अद्याप एप्रिल महिन्याचे वेतन मिळालेले नाही. तसेच सेवानवृत्तांनाही गेल्या तीन-चार महिन्यापासून पेन्शन मिळाले नसून

वेतनाचा तिढा कायम
नागपूर : जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील कर्मचार्यांना अद्याप एप्रिल महिन्याचे वेतन मिळालेले नाही. तसेच सेवानवृत्तांनाही गेल्या तीन-चार महिन्यापासून पेन्शन मिळाले नसून जि.प.तील वेतनाचा तिढा अद्याप कायम आहे. मुख्यालयातील कर्मचार्यांना वेतन मिळाले. परंतु ग्रामीणमधील काही पंचायत समित्यातील कर्मचार्यांच्या बँक खात्यात एप्रिल महिन्याचे वेतन जमा न झाल्याच्या तक्रारी आहेत.
अधिकार्यांच्या वेतनचे बीडीएस शासनाकडून आले नसतानाही त्यांना वेतन ठरलेल्या तारखेला मिळते. त्याच धर्तीवर शासन अनुदानातून कर्मचार्यांना वेतन द्यावे.
शासनाकडून वेतन अनुदान ठरलेल्या तारखेला मिळतेच असे नाही. ते मागेपुढे मिळत होते.असे असतानाही दर महिन्याच्या एक तारखेला वेतन मिळत होते ही परंपरा यापुढे कायम ठेवावी. यासाठी तातडीने तोडगा काढण्याची मागणी कर्मचारी संघटनांनी केली आहे. (प्रतिनिधी)