व्ही. थंगपांडियन महानिर्मितीच्या संचालकपदी रुजू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 22:53 IST2019-04-13T22:51:01+5:302019-04-13T22:53:00+5:30
व्ही. थंगपांडियन हे महानिर्मितीच्या संचालक(प्रकल्प) पदी रुजू झाले.

व्ही. थंगपांडियन महानिर्मितीच्या संचालकपदी रुजू
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : व्ही. थंगपांडियन हे महानिर्मितीच्या संचालक(प्रकल्प) पदी रुजू झाले. व्ही. थंगपांडियन यांनी सन १९८१ मध्ये मदुराई कामराज विद्यापीठातून बी.ई.(मेकॅनिकल) ही पदवी प्रथम श्रेणीत प्राविण्यासह उत्तीर्ण केलेली आहे. २७५०० मेगावॅट नेवेली लिग्नाईट वीज प्रकल्प, ३७६६० मेगावॅट घाटमपूर वीज प्रकल्प,३७८०० मेगावॅट नेवेली ओरिसा प्रकल्प, २७६६० नेवेली-२ अशा विविध वीज प्रकल्पांचे अभियांत्रिकी, बांधकाम, विकास व उभारणी कामे तसेच सुमारे ४२४० मेगावॅट औष्णिक ऊर्जा, ५१ मेगावॅट पवन ऊर्जा, ४४० मेगावॅट सौर ऊर्जा केंद्रांच्या संचालनाचा त्यांना दांडगा अनुभव आहे.
नागपूर जिल्ह्यातील एन.टी.पी.सी. मौदा येथील २३२० मेगावॅट, विंध्याचल येथील ३२६० मेगावॅट येथील वीज प्रकल्पांचे प्रमुख म्हणून तर ३७२०० मेगावॅट, ३७५०० मेगावॅट रामागुंडम वीज प्रकल्प उभारणी कामे व विशेषत: बाष्पक देखरेख कार्यभार त्यांनी यशस्वीपणे सांभाळला आहे.