शहरं
Join us  
Trending Stories
1
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
4
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
5
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
6
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
7
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
8
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
9
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
10
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
11
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
12
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
13
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
14
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
15
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
16
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
17
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
18
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
19
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
20
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस

उपराष्ट्रपतींची संघ स्मृतिमंदिराला भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 01:53 IST

देशाचे उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांनी शुक्रवारी सायंकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्मृतिमंदिराला भेट दिली.

ठळक मुद्देसुरक्षा यंत्रणांची धावपळ : भेट देणारे ठरले पहिले उपराष्ट्रपती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशाचे उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांनी शुक्रवारी सायंकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्मृतिमंदिराला भेट दिली. यावेळी त्यांनी आद्य सरसंघचालक डॉ.केशव बळीराम हेडगेवार व द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले. संघस्थानाला भेट देणारे ते पहिले उपराष्ट्रपती ठरले.‘अ‍ॅग्रोव्हिजन’चा कार्यक्रम आटोपल्यानंतर उपराष्ट्रपतींचा ताफा कार्यक्रमस्थळातून निघाला. मात्र ऐनवेळी विमानतळाऐवजी ताफा स्मृतिमंदिर परिसरात शिरला. यावेळी उपराष्ट्रपतींसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी हेदेखील उपस्थित होते. उपराष्ट्रपतींच्या नियोजित कार्यक्रमात ही भेट नव्हती. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांची धावपळ झाली. अनेक पोलीस अधिकारी तर धावतच स्मृतिमंदिरात पोहोचले.विशेष म्हणजे यावेळी संघाच्या ४५ हून अधिक वयाच्या स्वयंसेवकांचा राष्ट्रीय पातळीवरील तृतीय वर्ष वर्ग सुरू होता. संघस्थानावर सुमारे ८०० स्वयंसेवक जमले असतानाच उपराष्ट्रपती तेथे पोहोचल्याने सर्वांमध्ये उत्सुकता दिसून आली. संघातर्फे सहसरकार्यवाह सुरेश सोनी, तृतीय वर्ष सर्वाधिकारी नानासाहेब जाधव, महानगर सहकार्यवाह रवींद्र बोकारे यांनी उपराष्ट्रपतींचे स्वागत केले. यावेळी सुरेश सोनी यांनी उपराष्ट्रपतींना भारतमातेची प्रतिमा भेट दिली.यावेळी राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन तसेच पशुसंवर्धन व दुग्धविकास राज्यमंत्री महादेव जानकर हेदेखील उपस्थित होते.अखेर नायडूंनी योग साधला२०१४ साली केंद्रात सत्ताबदल झाल्यापासून नागपुरात ‘व्हीव्हीआयपी’ नेत्यांची वर्दळ वाढली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील शहराला भेट दिली. मात्र त्यांनी संघस्थानी भेट देण्याचे टाळले होते. त्यामुळे उपराष्ट्रपतीदेखील तोच कित्ता गिरवतील, अशी अपेक्षा होती. मात्र ऐनवेळी उपराष्ट्रपतींनी संघ स्मृतिमंदिराला भेट देण्याची इच्छा व्यक्त केली. याअगोदर अटलबिहारी वाजपेयी यांनी पंतप्रधान असताना २००० साली संघ मुख्यालयाला भेट दिली होती. वेंकय्या नायडू यांनी संघस्थानाला भेट दिल्यामुळे संघ वर्तुळातूनदेखील समाधान व्यक्त करण्यात आले. वेंकय्या नायडू हे लहानपणापासून संघाचे स्वयंसेवक राहिले आहेत. स्वयंसेवक असताना, भाजपा अध्यक्ष झाल्यावर,केंद्रीय मंत्री म्हणून त्यांनी अनेकदा नागपूर तसेच संघ मुख्यालयाला भेट दिली आहे. उपराष्ट्रपती म्हणून त्यांची ही पहिली भेट ठरली.