दाेन कुटुंबात हाणामारी, दाेघे जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:12 IST2021-05-05T04:12:00+5:302021-05-05T04:12:00+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क काटाेल : घरासमाेर उभ्या असलेच्या चारचाकी वाहनाच्या काचा फाेडल्याच्या आराेपावरून उद्भवलेले भांडण विकाेपास गेले आणि त्याचे ...

दाेन कुटुंबात हाणामारी, दाेघे जखमी
लाेकमत न्यूज नेटवर्क
काटाेल : घरासमाेर उभ्या असलेच्या चारचाकी वाहनाच्या काचा फाेडल्याच्या आराेपावरून उद्भवलेले भांडण विकाेपास गेले आणि त्याचे पर्यवसान दाेन कुटुंबातील सदस्यांच्या हाणामारीत झाले. यात दाेघे जखमी झाले असून, पाेलिसांनी दाेन्ही कुटुंबातील सदस्यांविरुद्ध गुन्हे नाेंदवित त्यांना अटक केली आहे. ही घटना काटाेल पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील खापरी (केणे) येथे रविवारी (दि. २) दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली.
जगदीश चंद्रावत व किरण शिवलाल भुरानी दाेघेही रा. खापरी (केणे) अशी जखमींची नावे आहेत. गीता जगदीश चंद्रावत यांच्या घरासमाेर त्यांचे एमएच-४०/बीजे-५८६१ क्रमांकाचे चारचाकी वाहन उभे हाेते. त्या वाहनाच्या काचा फाेडल्याने त्यांनी भुरानी कुटुंबीयांना विचारणा केली. त्यावर चिडलेल्या किरण भुरानी, अनिल भुरानी, दीपक भुरानी व सुनील भुरानी या चाैघांनी त्यांना जबर मारहाण केली. त्यांच्या डाेक्यावर लाेखंडी राॅडने वार केल्याने ते गंभीर जखमी झाले. गीता चंद्रावत यांच्या तक्रारीवरून पाेलिसांनी चाैघांविरुद्ध गुन्हा नाेंदवून त्यांना अटक केली.
दुसरीकडे, जगदीश चंद्रावत हे दारू पिण्यासाठी शेतात गेले हाेते. त्यातच त्यांनी दीपक भुरानी यास मारहाण केली. त्यानंतर जगदीश चंद्रावत, जयदेव चंद्रावत, सागर चंद्रावत व राेशन चंद्रावत यांनी आपल्याला शिवीगाळ केली व मारण्याची धमकी दिली. शिवाय, जगदीश व सागर यांनी डाेक्यावर काठीने वार करून जखमी केले, अशी तक्रार किरण भुरानी याने पाेलिसात नाेंदविल्याने चंद्रावत कुटुंबातील चाैघांविरुद्ध गुन्हे नाेंदवित त्यांना अटक करण्यात आली. या घटनेचा तपास पाेलीस उपनिरीक्षक संताेष निंभाेरकर करीत आहेत.