नागपुरातील धरमपेठेत हिंस्र श्वानांची दहशत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2019 00:21 IST2019-09-22T00:20:36+5:302019-09-22T00:21:31+5:30

मुलीला शाळेत सोडण्यासाठी गेलेल्या वडिलावर आणि मुलीवर धरमपेठ भागात पाच-सहा श्वानांच्या घोळक्याने हल्ला चढवत, दोघांनाही जखमी केले आहे.

Violence of dogs at Dharampethe in Nagpur | नागपुरातील धरमपेठेत हिंस्र श्वानांची दहशत 

नागपुरातील धरमपेठेत हिंस्र श्वानांची दहशत 

ठळक मुद्दे वडील आणि मुलीवर हल्ला

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरात बेवारस श्वानांनी धुमाकूळ घातला असून, नागरिक त्रस्त झाले आहेत. याबाबत अनेक तक्रारी करण्यात आल्या असतानाही, प्रशासनाला बेवारस श्वानांचा बंदोबस्त करता आलेला नाही. त्याच पार्श्वभूमीवर मुलीला शाळेत सोडण्यासाठी गेलेल्या वडिलावर आणि मुलीवर धरमपेठ भागात पाच-सहा श्वानांच्या घोळक्याने हल्ला चढवत, दोघांनाही जखमी केले आहे. मनात धडकी भरेल, अशा या जखमा आहेत.
रामनगर येथील विकास रामदास पुंड यांची मुलगी अंशिका धरमपेठेतील बिशप कॉटन स्कूलमध्ये शिकते. तिला शाळेत पोहोचवून देण्यासाठी गेले असता, तेथील दूध डेअरीपुढे असलेल्या पाच-सहा श्वानांनी अचानक दोघांवरही हल्ला चढवला. या हल्ल्यात ते थोडक्यात बचावले असले तरी, दोघांच्याही मानेवार, डोक्यावर आणि पायावर जबर जखमा झाल्या आहेत. चवताळलेल्या श्वानांच्या या हल्ल्याची स्थिती आणखी बिकट होऊ शकली असती. मात्र, विकास यांनी प्रतिकार केल्यामुळे ते थोडक्यात बचावले. मोकाट श्वानांचा बंदोबस्त लावण्यासाठी प्रशासन कायम अपयशी ठरले आहे. याबाबत अनेकदा नागरिकांकडून तक्रारी करण्यात आल्या असतानाही, त्याबाबत महापालिकेकडून कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही. या घटनेने धास्तावलेल्या विकास पुंड यांनी मोकाट श्वानांचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.

Web Title: Violence of dogs at Dharampethe in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.